धक्कादायक; विजेचा धक्का लागून वायरमनचा जागीच मृत्यू; मंगळवेढा शहरातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2020 08:58 IST2020-10-27T08:57:20+5:302020-10-27T08:58:11+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग

धक्कादायक; विजेचा धक्का लागून वायरमनचा जागीच मृत्यू; मंगळवेढा शहरातील घटना
मंगळवेढा : विजेच्या खांबावर काम करीत असताना अचानक विद्युत प्रवाह सुरु झाल्याने वायरमनचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना मंगळवेढा शहरातील शनिवार पेठ परिसरात सोमवारी रात्री ९.४० च्या सुमारास घडली.
बिलाल अब्दुलकादर शेख (२६ रा.लवंगी ता.मंगळवेढा) असे त्या मयत वायरमनचे नाव आहे मंगळवेढा शहरातील शनिवार पेठ, मुरलीधर चौक आदी भागातील विजेचा पुरवठा सुरळीत ठेवण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती. त्यामुळे त्यांचे दैनंदिन काम सुरु होते. रात्री ९.१५ वाजेच्या सुमारास ते विजेच्या खांबावर चढून आपले काम करीत असताना अचानक विजेचा प्रवाह सुरु झाला आणि क्षणार्धात त्यांना काही कळायच्या आत विजेचा झटका बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना संजीवनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्याठिकाणी डॉक्टरांनी तपासून बिलाल शेख यांना मृत घोषित करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन लहान मुले, भाऊ असा परिवार आहे.