धक्कादायक; मालगाडीवर उभारून सेल्फी काढणाऱ्या सोलापुरातील तरूणाचा दुदैवी मृत्यू
By Appasaheb.patil | Updated: August 29, 2022 15:35 IST2022-08-29T15:33:31+5:302022-08-29T15:35:30+5:30
इलेक्ट्रिक वायरचा कंरट लागून तरुण भाजला

धक्कादायक; मालगाडीवर उभारून सेल्फी काढणाऱ्या सोलापुरातील तरूणाचा दुदैवी मृत्यू
सोलापूर : थांबलेल्या मालगाडीवर चढून सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही मात्र यामुळे मालगाडीवरील इलेक्ट्रिक वायरचा करंट लागला आणि तरुण गंभीररीत्या भाजला. ही घटना रविवारी पावणेसहाच्या सुमारास पुण्याच्या दिशेने असलेल्या मालधक्क्याजवळ घडला. मात्र उपचार सुरू असताना सोमवारी दुपारी एकच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालावली.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रविवारी दुपारच्या वेळी मुकासिद व त्याचा मित्र रेल्वे मालधक्क्याकडे गेले होते. येथे गेल्यानंतर त्यांना सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही. मालगाडीवर ते चढले. सेल्फी काढत असताना नकळतपणे त्याचा हात मालगाडीवरील असलेल्या वायरींना लागला. यात करंट लागल्याने तो दूर फेकला गेला. यामुळे त्याच्या शरीर काळे निळे पडल्याचे दिसून आले.
या प्रकाराची खबर लोहमार्ग पोलिसांना मिळताच हवालदार पट्टणशेट्टी यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्याला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र सोमवारी दुपारी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.