धक्कादायक; तलावात बुडून आईसह दोन मुलींचा दुदैवी मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 19:11 IST2020-12-19T19:11:08+5:302020-12-19T19:11:11+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकींग

धक्कादायक; तलावात बुडून आईसह दोन मुलींचा दुदैवी मृत्यू
सोलापूर -कपडे धुण्यासाठी गेलेल्या आईसह दोन मुलींचा तलावाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी घडली. ही घटना तळसंगी (ता. मंगळवेढा) येथे घडली. या घटनेत रेश्मा बगताज शेख (वय ३५), सुफीया बगताज शेख (वय ११) व खुशबू बगताज शेख (वय ९) असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, शनिवारी सकाळी तळसंगी गावाजवळअसलेल्या तलावात कपडे धुण्यासाठी रेश्मा शेख या त्यांच्या दोन मुलींसोबत गेल्या होत्या. त्यावेळी रेश्मा यांचा पाय घसरून तोल गेला आणि त्या पाण्यात पडल्या. त्यांना पाेहता येत नसल्याने बुडू लागल्यानंतर त्यांच्या मदतीसाठी सुफीया व खुशबू या मुलींनीही पाण्यात उडी घेतली. मात्र त्या मुलींनाही पोहता येत नसल्याने त्याही बुडू लागल्या. ही घटना पाहताच गावातील नागरिकांनी उड्या टाकून तिघींना पाण्याबाहेर काढण्याचा प्रयत्न केला मात्र तो असफल ठरला. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्याचे सांगण्यात आले.