धक्कादायक! गळफास घेऊन एकाच दिवशी सोलापुरातील तिघांनी संपवले आयुष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 17:36 IST2025-03-11T17:36:11+5:302025-03-11T17:36:46+5:30
महिलेने लाकडी वाशाला कापडी फेट्याच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

धक्कादायक! गळफास घेऊन एकाच दिवशी सोलापुरातील तिघांनी संपवले आयुष्य
सोलापूर : सोमवारी दिवसभरात शहरातील बाळे, शिवलिंग नगर अन् वैदुवाडी भवानी पेठ येथील रहिवासी असलेल्या तिघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. यामध्ये दोन पुरुष व एका महिलेचा समावेश आहे.
अंबिका नगरातील बाळे येथील राहत्या घरी अज्ञात कारणावरून छताच्या लोखंडी अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन प्रौढाने आत्महत्या केली. हा प्रकार सोमवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला. विजयकुमार नारायण भोसले (वय ४९, रा. अंबिका नगर) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. त्यांना फौजदार चावडी पोलिस ठाण्याचे हवालदार जाधव यांनी उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता, त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. शिवलिंग नगर, सुनील नगर येथील राहत्या घरी अज्ञात कारणावरून छताच्या लोखंडी हुकाला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन तरुणाने आत्महत्या केली. हा प्रकार सोमवारी दुपारी १२:०५ वाजण्याच्या सुमारास घडला. अभिषेक यनगंदुल (वय २५) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे.
महिलेने कापडी फेट्याने घेतला गळफास
भवानी पेठेतील वैदुवाडी येथील राहत्या घरी अज्ञात कारणावरून महिलेने लाकडी वाशाला कापडी फेट्याच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार सोमवारी दुपारी १:१५ वाजता उघडकीस आला. मंगलाबाई (वय अंदाजे ५० ते ५५ पूर्ण नाव नाही) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. मात्र, तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. ही महिला भाड्याने राहात होती, असे सांगितले जाते.
विहिरीत उडी मारून आत्महत्या
कुमठे गावात एका तरुणाने गावातील पडीक विहिरीत उडी मारून जीवन संपवले. हा प्रकार १० मार्च रोजी ४.३० उघडकीस आला. अनिल वाघमारे (वय ३५, रा. सिद्धार्थनगर, कुमठे गाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. अग्निशामक दलाच्या साह्याने त्याला बाहेर काढून बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले असता डॉक्टरांनी मयत झाल्याचे सांगितले.