शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
4
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
5
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
6
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
7
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
8
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
9
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
10
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
11
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
12
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
13
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
14
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
15
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
16
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
19
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
20
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या

धक्कादायक; उजनी कॅनॉलमध्ये टेम्पो पडला; सात वर्षाच्या मुलीसह पित्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 3:00 PM

सोलापूर लोकमत ब्रेकींग

टेंभुर्णी : वैरण घेऊन घराकडे निघालेला छोटा हत्ती उजनी कॅनाॅलमध्ये पडून झालेल्या अपघातात ७ वर्षाच्या मुलीसह पित्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना माढा तालुक्यातील माळेगाव हद्दीत रविवारी सकाळी दहाच्या सुमारास घडली.

 याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की मिटकलवाडी येथील सध्या  रा. माळेगाव येथील तात्यासाहेब बाळासाहेब कोळी (वय २८) हा तरुण रविवार २० जानेवारी रोजी सकाळी ९.३० च्या सुमारास खुरपण्याच्या स्त्रियांना शेतात सोडून एम एच ४५/ ०३१२ या क्रमांकाच्या मालवाहू छोटा हत्तीमध्ये जनावरांसाठी वैरण घेऊन मिटकलवाडी- माळेगाव उजनी कॅनॉल पट्टीवरून माळेगावकडे निघाला होता. कॅनॉलच्या  एका वळणावर मायनर १४ जवळ टेम्पो पलटी होऊन कॅनॉलमध्ये पडला.

कॅनॉलमधून पाणी वाहत असल्याने टेम्पोमधून तात्यासाहेब कोळी व त्याची सात वर्षाची मुलगी यांना बाहेर पडता आले नाही. याठिकाणी लोकांची वर्दळ नसल्याने टेम्पो पाण्यात पडल्याचे लोकांच्या लवकर लक्षात आले नाही. सकाळी १०.३० वाजता लाईट आल्यानंतर लोक मोटार चालू करण्यासाठी शेताकडे निघाले असता त्यांना टेम्पो पाण्यात पडल्याचे लक्षात आले. यानंतर नातेवाईक व लोकांनी क्रेनच्या साह्याने टेम्पो बाहेर काढला असता तात्यासाहेब व मुलगी आरती मृतावस्थेत आढळून आले. नागनाथ भिकाजी कोळी यांनी याबाबतची खबर टेंभुर्णी पोलीस स्टेशनला दिली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक काजी हे करीत आहेत.------------तात्यासाहेब कोळी हे मूळचे मिटकलवाडी येथील रहिवासी असून सध्या ते माळेगाव येथे कुटुंबासह  मोलमजुरी करून राहात होते. ते त्यांच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होते. त्यांच्या पश्चात पत्नी, आई- वडील व दोन मुली असा परिवार आहे.

 

टॅग्स :SolapurसोलापूरAccidentअपघातDeathमृत्यू