धक्कादायक; मंगळवेढा शहरात ऐन दिवाळी सणात तरूणीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2021 20:22 IST2021-11-06T20:15:10+5:302021-11-06T20:22:29+5:30

आत्महत्येचे कारण अस्पष्ठ; पाेलीसांनी व्हिसेरा राखून ठेवला

Shocking; Suicide of a young woman during Ain Diwali festival in Mangalwedha city | धक्कादायक; मंगळवेढा शहरात ऐन दिवाळी सणात तरूणीची आत्महत्या

धक्कादायक; मंगळवेढा शहरात ऐन दिवाळी सणात तरूणीची आत्महत्या

मंगळवेढा : मंगळावेढा शहरातील फुगारे गल्लीतील एका 36 वर्षीय महिलेने अज्ञात कारणावरून पंख्याच्या हुकाला आौढणीच्या साह्याने गळफास घेऊन ऐन दिवाळीत  सणात आत्महत्या केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, या घटनेची पोलिसांत अकस्मात मयत नोंद झाली असून आत्महत्येचे कारण अस्पष्ट असल्याने पोलिसांनी व्हिसेरा राखून ठेवला आहे.


 पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी यातील मयत अंबिका विनोद नलवडे (वय 36 रा. वाटंबरे ता.सांगाेला, हल्ली राहणार फुगारे गल्ली, मंगळवेढा)  हिने शनिवार 5 नोव्हेंबर २०२१ रोजी दुपारी १ वाजता अज्ञात  कारणावरून पत्राच्या लोखंडी अँगलला लावलेला फॅनच्या हुकास ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची खबर अजिंक्य गुंगे यांनी दिल्यावर  पोलिसांत अकस्मात मयत अशी नोंद झाली आहे. आत्महत्येचे कारण अस्पष्ट असल्याने पोलिसांनी व्हिसेरा राखून  ठेवला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार तूकाराम कोळी करीत आहेत.

Web Title: Shocking; Suicide of a young woman during Ain Diwali festival in Mangalwedha city