धक्कादायक; अभ्यासाच्या टेन्शनमुळे तरुणीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 17:34 IST2020-01-14T17:32:13+5:302020-01-14T17:34:23+5:30
मोहोळ येथील घटना; विषारी औषध पिऊन संपविली जीवनयात्रा

धक्कादायक; अभ्यासाच्या टेन्शनमुळे तरुणीची आत्महत्या
ठळक मुद्दे- मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल- आत्महत्येचे कारण अद्याप गुलदस्त््यातच- अधिक तपास पोलीस नाईक विजयकुमार माने करीत आहेत
मोहोळ : अकरावीत शिकणाºया तरुणीने अभ्यासाच्या टेन्शनमुळे विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. ही घटना १३ रोजी दुपारी ३ च्या सुमारास मोहोळ येथे घडली.
स्वरांजली गणपत जाधव (वय १६) ही विद्यार्थिनी मोहोळ येथे एका विद्यालयात सायन्समध्ये शिकत होती. सोमवारी दुपारी घरात कोणी नसताना तिने थीमेट हे विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. याबाबत घरच्यांना समजल्यानंतर तिला तातडीने मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, परंतु उपचारापूर्वीच ती मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेची खबर मोहोळ पोलिसांत सर्जेराव शिवाजी जाधव यांनी दिली आहे़ अधिक तपास पोलीस नाईक विजयकुमार माने हे करत आहेत.