धक्कादायक! अचानक नाका-तोंडातून फेस आला अन् तरुणाचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 20:36 IST2025-01-15T20:35:59+5:302025-01-15T20:36:28+5:30
गावातील लोकांनी त्याला तात्काळ अक्कलकोट येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

धक्कादायक! अचानक नाका-तोंडातून फेस आला अन् तरुणाचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
Akkalkot: शेतातल्या बांधावर २२ वर्षीय तरुणाचा नाकातोंडातून फेस आला अन् अचानक तो मृतावस्थेत आढळून आला. १३ ते १४ जानेवारीदरम्यान सकाळी ०६:०० वाजेपूर्वी मिरजगी येथे ही घटना उघडकीस आली. सुनील रमेश निंबाळ असे मयत तरुणाचे नाव आहे. याबाबत दक्षिण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, १३ जानेवारी रोजी मिरजगी गावची यात्रा होती. सुनील गावातील यात्रेत फिरून येतो, असे सांगून बाहेर गेला होता. त्यानंतर रात्री १२:३० वाजेच्या सुमारास घरातील लोकांनी जेवणासाठी सुनीलला फोन लावला. मात्र, त्याने तो उचलला नाही. त्यामुळे तो परत येऊन जेवण करेल, या उद्देशाने ते झोपी गेले. त्यानंतर मंगळवारी (दि.१४ जानेवारी) सकाळी ०६:०० वाजेच्या सुमारास आई मल्लम्माने सांगितले की, सुनील हा पंडित मैंदर्गी यांच्या गावालगत असलेल्या शेताच्या बांधावर बेशुद्धावस्थेत पडला आहे. गावातील लोकांनी त्याला तात्काळ अक्कलकोट येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. त्यानंतर शवविच्छेदन करून प्रेत नातेवाइकांच्या हाती देण्यात आले. त्यावेळी त्याच्या तोंडातून व नाकातून पांढऱ्या रंगाचा फेस येत होता व डाव्या हाताच्या करंगळीच्या बोटाजवळ व मनगटावर काहीतरी चावल्यासारखी जखम दिसली आहे. याबाबत मयताचे भाऊ अनिल रमेश निंबाळ (वय ३१, धंदा खाजगी नोकरी, रा. मिरजगी) यांनी फिर्याद दिली.
दरम्यान, मंगळवारी दुपारी त्याच्या पार्थिवावर मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले. अधिक तपास हवालदार राऊत हे करत आहेत.