धक्कादायक! गळा आवळून सलून व्यावसायिकाचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 17:03 IST2025-01-20T17:02:52+5:302025-01-20T17:03:42+5:30

पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने फिरवून एका संशयितास माळशिरस येथून ताब्यात घेतलं आहे.

Shocking Salon professional murdered by strangulation | धक्कादायक! गळा आवळून सलून व्यावसायिकाचा खून

धक्कादायक! गळा आवळून सलून व्यावसायिकाचा खून

Mohol Murder: अज्ञात कारणावरून गळा आवळून सलून व्यावसायिकाचा खून केला व त्याचा मृतदेह आंब्याच्या बागेत फेकून आरोपी पसार झाला. ही घटना रविवार १९ जानेवारी रोजी दुपारी २ च्या सुमारास कमलापूर ता. सांगोला येथील हॉटेल आकाशच्या पाठीमागील आंब्याच्या बागेत उघडकीस आली. संतोष किसन चव्हाण (वय ४५ रा. खर्डी ता. पंढरपूर) असे मृताचे नाव आहे. या घटनेची फिर्याद पत्नी स्वाती संतोष चव्हाण यांनी दिली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवार दि. १७ जानेवारी रोजी दुपारी ४ च्या सुमारास संतोष चव्हाण हे दुकानात काम करीत होते. मात्र सायंकाळी ६ च्या सुमारास तुषार हिल्लाळ यांनी घरी फोन करून संतोष घरी आलेत का? अशी विचारणा केली. सायंकाळी ५ च्या सुमारास त्यांचा जालना येथील मित्र गोविंद हा दुकानात आला होता. दरम्यान तो अधून मधून घरी येत होता. तसेच फिर्यादीने शनिवारी १८ जानेवारी रोजी ८:३० च्या सुमारास गोविंद यास फोन करून पती संतोष चव्हाण कोठे आहेत असे विचारले होते. त्याने फिर्यादीला संतोष कालच माझ्यापासून गेलेले असून, मी झोपलो आहे. उद्या सकाळी मला फोन करा म्हणून फोन बंद केला. त्यानंतर पोलिसांनी फिर्यादी पत्नी स्वाती चव्हाण यांनी खर्डी येथील घरी समक्ष भेट घेऊन रविवार दि. १९ रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास पती संतोष चव्हाण याचा फोटो दाखवले व कमलापूर येथील हॉटेलच्या पाठीमागे आंब्याच्या बागेत त्याचा खून झाला आहे, असं फिर्यादीत म्हटलं आहे.

दरम्यान, पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने फिरवून एका संशयितास माळशिरस येथून ताब्यात घेतले आहे. आणखी एकजण फरार असल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रांत गायकवाड यांनी सांगितले.

Web Title: Shocking Salon professional murdered by strangulation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.