धक्कादायक; सेवानिवृत्त पोलिस कर्मचार्‍याने अज्ञात कारणावरून केली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2020 08:48 IST2020-11-23T08:47:38+5:302020-11-23T08:48:15+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

Shocking; Retired police officer commits suicide for unknown reasons | धक्कादायक; सेवानिवृत्त पोलिस कर्मचार्‍याने अज्ञात कारणावरून केली आत्महत्या

धक्कादायक; सेवानिवृत्त पोलिस कर्मचार्‍याने अज्ञात कारणावरून केली आत्महत्या

मंगळवेढा : ब्रम्हपुरी येथे मोहन चुडाप्पा सोनवले (वय ६६) या सेवानिवृत्त पोलिसाने लिंबाच्या झाडाला अज्ञात कारणावरून गळफास घेवून रविवारी पहाटेच्या दरम्यान आत्महत्या केली असून पोलिसांनी अकस्मात मयत अशी नोंद केली आहे. दरम्यान, मृत्यूचे कारण स्पष्ट नसल्यामुळे पोलिसांनी व्हिसेरा राखून ठेवला आहे.

  पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,यातील मयत मोहन सोनवले हे सेवानिवृत्त पोलिस कर्मचारी असून ते सेवानिवृत्तीनंतर ब्रम्हपुरी येथे त्यांच्या मूळ गावी आले होते. मयताची मुलगी पोलिस अधिकारी तर मुलेही पोलिस खात्यात असल्याचे पोलिसांनी सांगितले. दि. २२ रोजी पहाटे पाच वाजता भिमनगर येथे पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या लिंबाच्या झाडाला अज्ञात कारणावरून गळफास घेवून आत्महत्या केल्याची खबर बाळासाहेब केराप्पा सोनवले याने पोलिसात दिली आहे.या घटनेचा अधिक तपास सहाय्यक फौजदार संजय राऊत हे करीत आहेत.

Web Title: Shocking; Retired police officer commits suicide for unknown reasons