धक्कादायक; चंदननगरातील शिक्षक महिलेचा खून, पतीला घेतले पोलिसांनी ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 16:30 IST2020-12-14T16:29:34+5:302020-12-14T16:30:07+5:30

सोलापुरातील घटना : विजापूर नाका पोलीस ठाण्यात नोंद

Shocking; Murder of a teacher woman in Chandannagar, husband arrested by police | धक्कादायक; चंदननगरातील शिक्षक महिलेचा खून, पतीला घेतले पोलिसांनी ताब्यात

धक्कादायक; चंदननगरातील शिक्षक महिलेचा खून, पतीला घेतले पोलिसांनी ताब्यात

सोलापूर : जुळे सोलापूर परिसरातील चंदन नगर येथील नीता रेसिडेन्सी या अपार्टमेंटमध्ये शिक्षक महिलेच्या डोक्यात वरवंटा घालून खून केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे. याप्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. 


अर्चना विकास हरवाळकर (वय ३५) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. अर्चना हरवाळकर ही पती विकास हरवाळकर व मुलगा वेदांत हरवाळकर (वय ०६) असे नीता रेसिडेन्सी मध्ये पहिल्या मजल्यावर राहत होते. सकाळी पती विकास हरवाळकर यांच्या मोबाईलच्या स्टेटसवर फाशीचा दोरखंड व त्याच्या बाजूला 'मला माफ करा आम्ही विश्वासाला पात्र राहिलो नाही' अशा शब्दात वाक्य लिहिण्यात आले होते. स्टेटस पाहून जवळच राहणारा नातेवाईक गडबडीने सकाळी विकास हरवाळकर यांच्या घरी आला.

बाहेरून दरवाजा वाजवला तेव्हा काही वेळानंतर विकास हरवाळकर याने दार उघडले. दार उघडल्यानंतर नातेवाईक आतमध्ये गेला व त्याने बेडरूम पाहिले असता त्या ठिकाणी अर्चना हरवाळकर ही रक्ताच्या थारोळ्यात मध्ये पडलेली दिसून आली. जवळ जाऊन पाहणी केली असता ती जागेवरच मरण पावल्याचे लक्षात आले. नातेवाईकाने तात्काळ विजापूर नाका पोलीस ठाण्यात संपर्क साधून माहिती दिली. पोलीस घटनास्थळी येऊन चौकशीसाठी शिक्षक पती विकास हरवाळकर याला ताब्यात घेतले आहे.

Web Title: Shocking; Murder of a teacher woman in Chandannagar, husband arrested by police