Shocking; The minor girl was murdered and dumped on the Phantom Railway | धक्कादायक; अल्पवयीन मुलीचा खून करुन प्रेत रेल्वे रुळावर टाकून दिले

धक्कादायक; अल्पवयीन मुलीचा खून करुन प्रेत रेल्वे रुळावर टाकून दिले

ठळक मुद्दे- अक्कलकोट तालुक्यातील चिंचोळी येथील मुलगी- रूद्देवाडी शिवारात ठार मारून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न- अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल

अक्कलकोट : तालुक्यातील चिंचोळी (मैं.) येथून फूस लावून पळवून नेलेल्या एका १६ वर्षीय मुलीस रुद्देवाडी शिवारात ठार मारून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 

रुपाली विजयकुमार आंदेवाडी असे खून झालेल्या अल्पवयीन मुलीचे नाव असून, २२ सप्टेंबर रोजी ही घटना उघडकीस आली आहे. याबाबत मृत मुलीचे वडील विजयकुमार हणमंत आंदेवाडी यांनी दक्षिण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

शनिवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास संशयित आरोपी नीलकंठ उर्फ कंट्यप्पा बसप्पा बजंत्री उर्फ गायकवाड (रा़ सिन्नूर), परशुराम शिवप्पा बजंत्री (रा़ दुधनी, ता़ अक्कलकोट) या दोघांनी स्वत:च्या मोटरसायकल(क्ऱएम़ एच़ १३/ बी. डी. १९८४)वर बसवून तिला चिंचोळी येथे घेऊन गेले. धारदार हत्याराने वार करुन तिला जीवे ठार मारले. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह रेल्वे रुळावर टाकून दिला, असे फिर्यादीत म्हटले आहे.

घटनेचे वृत्त समजताच उपविभागीय पोलीस अधिकारी डा़ॅ संतोष गायकवाड, पोलीस निरीक्षक विजय जाधव, पोलीस शिपाई काशिनाथ सदाफुले, हवालदार दीपक पाटील, हवालदार संजय जाधव, पोलीस नाईक राजू कोळी हे घटनास्थळी दाखल झाले़ यावेळी त्यांनी मृतदेहाचा पंचनामा केला़ त्यानंतर पोलिसांनी त्या दोन्ही संशयित आरोपींना ताब्यात  घेतले़ अधिक तपास पोलीस निरीक्षक विजय जाधव करीत आहेत.

पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार
- घटनास्थळी पोलिसांनी पंचनाम्यानंतर मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला़ मात्र अक्कलकोट येथे महिला डॉक्टर नसल्याने सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले़ रात्री उशिरा चिंचोळी या मूळगावी पोलीस बंदोबस्तात मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. खुनामागचे नेमके कारण पोलिसांना अद्याप समजू शकले नाही. 

 

Web Title: Shocking; The minor girl was murdered and dumped on the Phantom Railway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.