धक्क्कादायक; मुलाला घराबाहेर पाठवून सोलापुरातील विवाहित महिलेने घेतला गळफास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 13:23 IST2020-11-28T13:23:52+5:302020-11-28T13:23:55+5:30

प्रियकराला फोन करून घरी येण्यास सांगितले अन् पुढे काय झाले वाचा सविस्तर बातमी

Shocking; A married woman from Solapur strangled her son after sending him out of the house | धक्क्कादायक; मुलाला घराबाहेर पाठवून सोलापुरातील विवाहित महिलेने घेतला गळफास

धक्क्कादायक; मुलाला घराबाहेर पाठवून सोलापुरातील विवाहित महिलेने घेतला गळफास

सोलापूर : आपल्या पाच वर्षांच्या लहान मुलाला घराबाहेर पाठवून महिलेने दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार बाळे, लक्ष्मीनगर येथे गुरुवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडला.

सपना श्रीकांत कांबळे (वय ३५, रा. लक्ष्मीनगर, बाळे) ही महिला बाळे येथील लक्ष्मीनगरात राहण्यास होती. तिला पाच वर्षांचे मूल आहे. गेल्या काही दिवसांपासून ती तणावामध्ये होती. गुरुवारी दुपारी तिने प्रियकराला फोन करून घरी येण्यास सांगितले. प्रियकराने मला काम आहे नंतर येतो असे सांगितले. फोनवरील बोलणे बंद झाल्यानंतर सपना कांबळे या महिलेने आपल्या पाच वर्षांच्या लहान मुलाला खेळण्यासाठी घराबाहेर पाठवले आणि घरातील छताला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

हा प्रकार शेजारील लोकांच्या लक्षात येताच फौजदार चावडी पोलीस ठाण्याला संपर्क करून माहिती देण्यात आली. महिलेला खाली उतरून शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तिचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. याची नोंद फौजदार चावडी पोलीस ठाण्यात झाली आहे.

Web Title: Shocking; A married woman from Solapur strangled her son after sending him out of the house