धक्कादायक; कामती जिल्हा परिषद गटाचे सदस्य तानाजी खताळ यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 11:16 IST2021-03-31T11:15:37+5:302021-03-31T11:16:09+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

Shocking; Kamati Zilla Parishad group member Tanaji Khatal passed away | धक्कादायक; कामती जिल्हा परिषद गटाचे सदस्य तानाजी खताळ यांचे निधन

धक्कादायक; कामती जिल्हा परिषद गटाचे सदस्य तानाजी खताळ यांचे निधन

कामती : मोहोळ तालुक्यातील कामती जिल्हा परिषद गटाचे विद्यमान सदस्य तानाजी खताळ वय ५५ वर्ष यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या धक्याने निधन झाले.सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध हॉटेल जयशंकरचे मालक व लांबोटी गावचे सुपुत्र होते.

तानाजी खताळ यांना बुधवारी पहाटे तीव्र हृदयविकाराचा धक्का आला होता.यातच त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, मुले, नातवंडे असा परिवार आहे. लांबोटी गावचे ते दहा वर्षे सरपंच होते. जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती विजयराज डोंगरे यांचे समर्थक होते. भीमा लोकशक्ती परिवार गटातून ते जिल्हा परिषद कामती गटातून विजयी झाले होते.    

दिलखुलास स्वभावाचे व्यक्तिमत्व लाभलेले तानाजी खताळ यांचा केवळ मोहोळ तालुक्यातच नाही तर संपूर्ण जिल्ह्यात मोठा जनसंपर्क होता.खताळ यांच्या अचानक निधनाने कामती जि.प गटातील नागरिकांना धक्काच बसला आहे.

Web Title: Shocking; Kamati Zilla Parishad group member Tanaji Khatal passed away