धक्कादायक; दारू पिण्यास पैसे न दिल्याने पतीकडून पत्नीची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 13:15 IST2020-03-18T13:13:52+5:302020-03-18T13:15:16+5:30

पंढरपूर तालुक्यातील तुंगत येथील घटना; पोलीसांकडून तपास सुरू

Shocking; Husband murdered by wife for failing to pay for drinking | धक्कादायक; दारू पिण्यास पैसे न दिल्याने पतीकडून पत्नीची हत्या

धक्कादायक; दारू पिण्यास पैसे न दिल्याने पतीकडून पत्नीची हत्या

ठळक मुद्दे- पंढरपूर तालुक्यातील तुंगत येथील घटना- पंढरपूर ग्रामीण पोलीसांकडून तपास सुरू- जेवणाच्या अगोदर दारू पिण्यासाठी मागितले होते पैसे

सुस्ते : दारू पिण्यास पैसे न दिल्याने रागाच्या भरात पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना तुंगत (ता़ पंढरपूर) येथे मंगळवारी मध्यरात्री घडली़ विजया अशोक पवार (वय ४५) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे.

याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, तुंगत (ता. पंढरपूर) येथील विजया अशोक पवार (वय ४५) या महिलेची अशोक पवार (वय ५०) यांनी मानेवर कोयत्याने वार करून निर्घुण हत्या केली आहे. मंगळवार १८ मार्च रोजी भाजीसाठी मटन आणले होते.

जेवणाच्या अगोदर दारू पिण्यासाठी अशोक पवार यांनी पत्नी विजया पवार यांच्याकडे पैशाची मागणी केली होती. दारू पिण्यासाठी पैसे दिले नसल्याने तुंगत येथील अशोक पवार यांच्या शेतात राहत्या घरी विजय पवार यांच्यावर वार करून निर्घुण हत्या केली़ विजया पवार त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुले व एक अविवाहित मुलगा आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.


 

Web Title: Shocking; Husband murdered by wife for failing to pay for drinking