धक्कादायक; लॉजवर नेऊन अत्याचार केला अन् नग्न अवस्थेतील फोटोही काढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 10:50 IST2021-08-14T10:50:10+5:302021-08-14T10:50:17+5:30

चार जणांविराेधात सोलापूर शहर पोलिसात गुन्हा दाखल

Shocking; He was taken to the lodge and tortured. He also took nude photos | धक्कादायक; लॉजवर नेऊन अत्याचार केला अन् नग्न अवस्थेतील फोटोही काढले

धक्कादायक; लॉजवर नेऊन अत्याचार केला अन् नग्न अवस्थेतील फोटोही काढले

सोलापूर : वीस वर्षांच्या पीडित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल झाला आहे. तेजस राहुल बनसोडे (रा.भवानी पेठ) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पीडित महिलेने जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पीडित महिला ही वीस वर्षांची असून, २०१७ साली विवाह झाला होता. तिची ओळख आरोपी तेजस बनसोडे सोबत झाली. आरोपी बनसोडे याने पीडित महिलेला माझे तुझ्यावर प्रेम आहे, मला तुझ्याशी लग्न करायचे आहे, असे सांगितले व पीडितेला मोबाइल घेऊन दिले. त्यानंतर, त्याने पीडितेवर लॉजवर नेऊन अत्याचार केला. प्रत्येक वेळी अत्याचार करताना नग्न अवस्थेतील फोटो त्यांनी काढले, अशा आशयाची फिर्याद पीडित महिलेने दिली आहे. या फिर्यादीवरून आरोपी तेजस बनसोडेवर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास पोलीस करत आहेत.

Web Title: Shocking; He was taken to the lodge and tortured. He also took nude photos