Shocking; Eleven men and six women in prison contracted corona | धक्कादायक; जेलमधील ११ पुरुष आणि सहा महिलांना कोरोनाची लागण

धक्कादायक; जेलमधील ११ पुरुष आणि सहा महिलांना कोरोनाची लागण

ठळक मुद्देसोलापुरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढलीकोरोना बरोबर सारी या आजाराचेही आढळले रुग्णसोलापूर शहर पोलीस संचारबंदी काळात सतर्क

सोलापूर : गेल्या २४ तासात शहरात कोरोनाचे नवे ३० रुग्ण आढळून आल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी जाहीर केले. या २४ तासात कोरोनामुळे एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही. यात जेलमधील ११ पुरुष आणि सहा महिलांचा समावेश आहे. एका वैद्यकीय कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. 


नवे रुग्ण या भागातील आहेत : संगमेश्वर नगर १ महिला, जेल सोलापूर ११ पुरुष, सहा महिला, एकता नगर २ पुरुष, एक महिला, निवासी डॉक्टर वसाहत १ पुरुष, विनायक नगर १ पुरुष, शुक्रवार पेठ १ महिला, लोधी गल्ली एक पुरुष, सिध्देश्वर हौसिंग सोसायटी १ पुरुष आणि एक महिला, हनुमान नगर भवानी पेठ १ महिला, सिध्देश्वर नगर नई जिंदगी १ पुरुष, ७़० फूट रोड एक महिला. 


शहरात आतापर्यंत एक हजार १०७ रुग्ण आढळून आले आहेत. मृतांची संख्या ९४ आहे. अद्यापही ४४६ जणांवर उपचार सुरू आहेत. ५६७ जणांना डिस्जार्च देण्यात आला आहे.

Web Title: Shocking; Eleven men and six women in prison contracted corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.