धक्कादायक; दिव्यांग तरुणीवर म्हशी राखणाऱ्या दोन मित्रांनी केला अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 18:15 IST2021-07-20T18:15:41+5:302021-07-20T18:15:47+5:30

सोलापूर शहरातील घटना; एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Shocking; Divyang was tortured by two friends who were keeping buffaloes | धक्कादायक; दिव्यांग तरुणीवर म्हशी राखणाऱ्या दोन मित्रांनी केला अत्याचार

धक्कादायक; दिव्यांग तरुणीवर म्हशी राखणाऱ्या दोन मित्रांनी केला अत्याचार

सोलापूर : एका दिव्यांग तरुणीवर घरासमोर म्हशी राखण्यासाठी आलेल्या दोन युवकांनी आळीपाळीने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना सोलापुरात घडली. तरुणीच्या फिर्यादीवरून सोहेल इमामसाब आत्तार ( रा. कलावती नगर, एमआयडीसी ) व गणेश शंकर कोरे ( रा. संगमेश्वर नगर, अक्कलकोट रोड ) या दोन संशयित युवकांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पीडित तरुणीला काहीच वर्षापूर्वी एक अपंगत्व आले. तरुणीचे आई-वडील हे हॉटेलमध्ये कामास जातात. व लहान भावाचे शिक्षण सुरू असल्यामुळे पीडित तरुणी ही घरात एकटी असायची. दरम्यान, काही दिवसांपासून पीडित तरुणी घरात एकटी असताना दोन युवक हे पीडित तरुणीच्या घरासमोर म्हशी राखण्यासाठी येत होते. ते युवक पीडित तरुणीची जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होते.

चार दिवसापूर्वी पीडित तरुणी दुपारी ही घरात खुर्चीवर बसलेली असताना आरोपी सोहेल आत्तार याने पीडित तरुणीवर अत्याचार केला. व त्यानंतर सोहेलचा मित्र गणेश कोरे यानेही पीडितेवर अत्याचार केला. व त्यानंतर येऊन तू कोणाला काय सांगितले तर बघ असे म्हणत धमकावले. व त्यानंतर आरोपीने सलग चार दिवस पीडितेवर अत्याचार केला. ही घटना पीडितेने १८ जुलै रोजी आपल्या आईला सांगितले. अशा आशयाची फिर्याद पीडितेने पोलीस ठाण्यात दिली आहे. या फिर्यादीवरून आरोपी सोहेल आत्तार व गणेश कोरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास पोलीस करत आहेत.

 

Web Title: Shocking; Divyang was tortured by two friends who were keeping buffaloes