शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

धक्कादायक; अक्कलकोटमध्ये महिलेसह विद्यार्थिनीचा डेंग्यूने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2019 2:27 PM

सोलापूर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सुस्त; अक्कलकोट तालुक्यात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली

ठळक मुद्देअक्कलकोट शहर व तालुक्यात काही भागांमध्ये डेंग्यूने थैमान घातलेअक्कलकोट तालुक्यात ५०० हून अधिक लोकांना हा आजार जडलाडेंग्यू आजारामुळे शरीरातील पेशी कमी होऊन उपचार घेणाºया रुग्णांची संख्या वाढली

अक्कलकोट : शहर व तालुक्यात काही भागांमध्ये डेंग्यूने थैमान घातले आहे़ परिणामत: समर्थ नगर येथील एका ४० वर्षीय महिलेचा आणि अकरावीमध्ये शिकणाºया विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. तालुक्यात ५०० हून अधिक लोकांना हा आजार जडला आहे. हे रुग्ण विविध ठिकाणच्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. या साºया घडामोडीत आरोग्य यंंत्रणा मात्र सुस्त बनली असल्याचा आरोप सर्वसामान्यातून होतोय.

विवाहित महिला रेशमा सदाशिव म्हेत्री (वय ४०) आणि विजयालक्ष्मी राजेंद्र कोळी (वय १८) अशी मरण पावलेल्या दोघींची नावे असून तीन दिवसांपूर्वी या दोघींचा मृत्यू झाला़ मयत विजयालक्ष्मी ही ११ वी वर्गात कॉमर्स शाखेला शिकत होती. डेंग्यूची लागण झाल्यानंतर या दोघींना सोलापूर येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना पुणे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ तेथे उपचार सुरू असताना मृत्यू झाला़ या दोघीही अक्कलकोट तालुक्यात समर्थ नगर येथील रहिवासी आहेत.

तालुक्यात डेंग्यू आजारामुळे शरीरातील पेशी कमी होऊन उपचार घेणाºया रुग्णांची संख्या वाढली आहे. पाय पसरलेल्या या आजारावर उपाययोजना करण्यात नगरपालिका व आरोग्य विभाग यंत्रणा कुचकामी ठरली आहे. या जीवघेण्या आजारामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. आरोग्य यंत्रणेकडून उपाय योजनेची अपेक्षा व्यक्त होत आहे.

मागील १५ दिवसांत अक्कलकोट शहर व तालुक्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. यामुळे सर्वत्र पाणी साचून दलदल निर्माण झाली आहे. डास मोठ्या प्रमाणात वाढले आहे. नगरपालिका, संबंधित ग्रामपंचायती यांनी फवारणी, फॉगिंग करणे, घरोघरी फिरून पाण्याच्या साठवण टाकीत औषध टाकणे अशा उपाययोजना करणे गरजेचे आहे. रुग्णालयात औषधसाठ्याचा आढाावा घेण्याची आवश्यक्ता आहे़ आरोग्य प्रशासनाच्या कुठल्याच हालचाली दिसत नाहीत़ हत्तीरोग कार्यालयाकडून उघड्या गटारीवर फवारणी होत नाही़ ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र, अक्कलकोट ग्रामीण रुग्णालय, खासगी दवाखान्यांमध्ये रुग्णांची संख्या वाढली आहे  

या भागात वाढले आहेत रुग्ण- शिवाजीनगर तांडा, म्हेत्रे नगर, समर्थनगर,माणिक पेठ, खासबाग, संजय नगर, इंदिरा नगर, भीमनगर, नाईकवाडी गल्ली, बागवान गल्ली अशा विविध भागात रुग्ण आढळून येत आहेत. अलीक डे या भागातून या रुग्णांची संख्या वाढत चालली असून या ठिक ाणी आरोग्य यंत्रणेने धुराळणी, फवारणी आणि उपाययोजना सुरू केलेल्या दिसत नाहीत़

टंचाईमुळे बरेच लोक पाणी साठवून ठेवतात. किमान आठ दिवसातून एकदा तरी कोरडा दिवस पाळला पाहिजे़ आरोग्य कर्मचारी, नगरपालिका, ग्रामपंचायत, हत्तीरोग कार्यालय यांनी आपापल्या पातळीवर यंत्रणा राबवावी. विशेषत: फॉगिंग, फवारणी करणे आवश्यक आहे. नागरिकांनीसुद्धा डेंग्यू होऊ नये म्हणून परिसरातील साचलेले पाणी निकामी करावे. अशा प्रकारेच रुग्ण वाढत आहेत. ग्रामीण रुग्णालयात सर्व प्रकारच्या सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत़ - डॉ अशोक राठोडअधीक्षक, ग्रामीण रुग्णालय 

टॅग्स :Solapurसोलापूरhospitalहॉस्पिटलMedicalवैद्यकीयdengueडेंग्यूDeathमृत्यू