धक्कादायक; फोन करून भावाला बोलाविला; भाऊ येईपर्यंत झाडाला फास घेतला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 03:51 PM2021-07-25T15:51:46+5:302021-07-25T15:51:52+5:30

- दारूच्या नशेत आत्महत्या केल्याची चर्चा

Shocking; Called brother by phone; He grabbed the tree until his brother arrived | धक्कादायक; फोन करून भावाला बोलाविला; भाऊ येईपर्यंत झाडाला फास घेतला

धक्कादायक; फोन करून भावाला बोलाविला; भाऊ येईपर्यंत झाडाला फास घेतला

googlenewsNext

बार्शी : माझ्या पोटात दुखत आहे, मी दारू पिलो आहे, तरी मला न्यायला ये, असे फोन करून भावाला सांगून एकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. महेश प्रकाश शिंदे (वय ३२, रा. तळेवाडी, सुभाष नगर, बार्शी) असे त्याचे नाव आहे.

सदरची घटना बार्शी शहरात घडली. महेश शिंदे याचे कपड्याचे दुकान व गॅरेज आहे. ही दुकाने भाऊ अशोक आणि महेश चालवतात. अशोकला महेशने फोन करून बोलावले. थोड्या वेळाने अशोक महेशला आणण्यासाठी गेला. कॅन्सर हॉस्पिटलच्या आसपास इकडे तिकडे पाहिले असता तो दिसला नाही. रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांकडेही माझा भाऊ दिसला का अशी अशोकने रस्त्यावर विचारणा केली. तास दोन तास इकडे तिकडे त्याचा शोध घेत असताना कॅन्सर हॉस्पिटलच्या मागील बाजूस असलेल्या लिंबाच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने महेशने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. भाऊ अशोक शिंदे याने शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

Web Title: Shocking; Called brother by phone; He grabbed the tree until his brother arrived

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.