धक्कादायक; कडब्याने भरलेली पिकअप जळून खाक; दोन शेतकरी आगीत भाजले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 17:00 IST2021-04-02T17:00:17+5:302021-04-02T17:00:29+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकींग

धक्कादायक; कडब्याने भरलेली पिकअप जळून खाक; दोन शेतकरी आगीत भाजले
सोलापूर : मोहोळ तालुक्यातील नरखेड ते अनगर रोडवर कडब्याने भरलेल्या पिकअपने अचानक पेट घेतला. या घटनेत गाडीतील हजारो रूपयांचा कडबा जळून खाक झाला असून पिकअपही जळून खाक झाली आहे. सुमार दोन ते तीन तास गाडीतील कडबा जळतच होता. या घटनेत दोघेजण भाजले आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पिकअपने कडबा भरलेली गाडी वाळूजहून माढ्याकडे जात होती. या गाडीत सात ते आठ जण होते. त्यापैकी दोघेजण भाजले आहेत. विजयकुमार मोटे व बाळासाहेब निंबाळकर हे दोघे जण भाजले असून त्यांच्यावर शासकीय रूगणालया उपचार सुरू आहे. उर्वरित पाच जणांचा बलांबल बचावले. या घटनेची माहिती मिळताच वाळूज परिसरातील नागरिक घटनास्थळी दाखल झाले होते. आग विझविण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी धावपळ केली.