धक्कादायक; शरीराचे तुकडे करून पोत्यात भरून टाकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 14:37 IST2020-01-09T14:34:11+5:302020-01-09T14:37:21+5:30
सोलापुरातील घटना; आसरा पुलाशेजारील रेल्वे रूळावर एकाचा मृतदेह आढळला

धक्कादायक; शरीराचे तुकडे करून पोत्यात भरून टाकले
सोलापूर : येथील आसरा चौकाशेजारी असलेल्या पुलाजवळील रेल्वे रूळाशेजारी एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला़ शरीराचे बारीक बारीक तुकडे करून पोत्यात भरून टाकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. महेंद्र माधवदास बुवा असे त्या मयत व्यक्तीचे नाव असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे. या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनी सांगितले. या घटनेबाबत काही पुरावे सापडतील का याचा शोध घेण्यासाठी पोलीसांनी रेल्वे रूळ परिसरातील सर्वच भागांची पाहणी केली.