धक्कादायक; खर्डी येथे रेल्वे रुळावर आढळून आला लष्करी जवानाचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 12:49 IST2020-02-09T12:27:33+5:302020-02-09T12:49:41+5:30

बेळगाव येथे ट्रेनिंगसाठी आल्यानंतर भारतीय जवानाचा संशयास्पद मृत्यू; कुटुंबियांनी व्यक्त केली घातपाताची शक्यता

Shocking; The body of a military jawan was found on the railway track in Khardi | धक्कादायक; खर्डी येथे रेल्वे रुळावर आढळून आला लष्करी जवानाचा मृतदेह

धक्कादायक; खर्डी येथे रेल्वे रुळावर आढळून आला लष्करी जवानाचा मृतदेह

ठळक मुद्देपंढरपूर पोलीस घटनास्थळी दाखलजवानाच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली घातपाताची शक्यता

पंढरपूर : जम्मू-काश्मीर येथे भारतीय लष्करात कार्यरत असलेला जवान बेळगाव येथे ट्रेनिंगसाठी आल्यानंतर त्याचा संशयास्पद मृत्यू झाला असून, रविवारी खर्डी ( ता. पंढरपूररेल्वे रुळावर त्याचा मृतदेह आढळून आला. 
 याबाबत अधिक माहिती अशी की बेळंकी (ता. जत) येथील अनुसे सुुखदेेेव भागाप्पा (वय २७)  हा भारतीय सेना दलात २०१३ पासून कार्यरत असून प्रशिक्षणासाठी तो रविवारी बेळगाव येथे दाखल झाला. दाखल झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो त्या ठिकाणाहून दुपारी बाहेर पडला. सोमवारी दुपारनंतर त्याचा संपर्क होत नसल्याने मंगळवारी या बाबत बेळगाव पोलिसात कळविण्यात आले होते. 

खर्डीजवळ रेल्वे रुळावर रविवारी सुखदेव यांचा मृतदेह आढळून आला.  त्यांच्या खिशात कोल्हापूर-सोलापूर रेल्वेचे पाच फेब्रुवारीचे तिकीट तसेच इतर कागदपत्रे देखील आढळून आली आहेत. त्याच्या नातेवाईकांनी घातपाताची शक्यता व्यक्त केली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी घटनास्थाली भेट दिली. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: Shocking; The body of a military jawan was found on the railway track in Khardi