धक्कादायक! ३० वर्षीय तरुणाने केला तीन महिलांचा खून; मंगळवेढा तालुक्यातील घटना

By Appasaheb.patil | Updated: February 21, 2023 20:27 IST2023-02-21T20:26:36+5:302023-02-21T20:27:09+5:30

या तीन महिलाच्या खुनामुळे गावावर शोककळा पसरली असून, भितीचे वातावरण आहे.

Shocking! A 30-year-old man killed three women; Incidents in Mangalvedha Taluk | धक्कादायक! ३० वर्षीय तरुणाने केला तीन महिलांचा खून; मंगळवेढा तालुक्यातील घटना

धक्कादायक! ३० वर्षीय तरुणाने केला तीन महिलांचा खून; मंगळवेढा तालुक्यातील घटना

सोलापूर : मंगळवेढा तालुक्यात बुधवारी सायंकाळच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली आहे. एका ३० वर्षीय मुलाने तीन महिलांचा खून केल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला. या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

दरम्यान, तालुक्याच्या दक्षिण भागात असलेल्या नंदेश्वरात दुपारी एकच्या दरम्यान अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून या महिलांचा खून केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या तीन महिलांचा राहत्या घरासमोर हत्याराच्या सहायाने खून करण्यात आला. तिन्ही महिलांचे मृतदेह घरासमोर अत्यावस्थ पडली होती. एकाच घरातील तीन महिलांच्या खून सत्रामुळे सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे सह वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल होत आहेत. 

या तीन महिलाच्या खुनामुळे नंदेश्वर गावावर शोककळा पसरली असून, अचानक झालेल्या खून सत्रामुळे गावात भितीचे वातावरण पसरले. त्यामुळे पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने हलवत एका ३० वर्षीय तरूणास पोेलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्या तरूणामध्ये व एका महिलेमध्ये किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. हे भांडण सोडविण्यासाठी आलेल्या महिलेसह अन्य एका महिलेच्या डोक्यात तीक्ष्ण हत्याराने त्या तरूणाने वार केल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: Shocking! A 30-year-old man killed three women; Incidents in Mangalvedha Taluk