धक्कादायक; लग्नाचे आमिष दाखवून २५ वर्षीय महिलेवर तरूणाने केला अत्याचार; मंगळवेढ्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2021 20:34 IST2021-11-06T20:34:18+5:302021-11-06T20:34:44+5:30

दोघांवर गून्हा दाखल; मुंढेवाडी येथील घटना

Shocking; 25-year-old woman tortured by youth; Incidents on Mars | धक्कादायक; लग्नाचे आमिष दाखवून २५ वर्षीय महिलेवर तरूणाने केला अत्याचार; मंगळवेढ्यातील घटना

धक्कादायक; लग्नाचे आमिष दाखवून २५ वर्षीय महिलेवर तरूणाने केला अत्याचार; मंगळवेढ्यातील घटना

मंगळवेढा : एका 25 वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करून मारहाण व दमदाटी केल्याप्रकरणी मुंढेवाडी येथील आकाश सिद्धेश्वर गडहिरे, छाया सिद्धेश्वर गडहिरे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील पीडित महिला तथा फिर्यादी ही बारामती येथील असून आराेपीने तिच्या राहत्या घरी जाऊन तू माझ्या शेजारी बस, मला तुझ्याशी बाेलायचे आहे असा बनाव करून पिडीतेला अंगावर ओढून घेऊन तिच्या मनास लज्जा वाटेल असे कृत्य केले, नंतर दि.१२ एप्रिल ते दि.२ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत मुंढेवाडी येथे लग्नाचे अमिष दाखवून घराच्या पाठीमागील शेतात वेळाेवेळी अत्याचार केला असल्याचे पिडीतेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. पिडीतेने आराेपी आकाश यास लग्नाबाबत विचारणा केली असता पिडीतेस आई छाया व आराेपी मुलगा या दाेघांनी दमदाटी करून मारहाण केल्याचे तक्रारीत नमुद केले  आहे. आधिक तपास सहाय्यक पाेलीस निरीक्षक सत्यजित आवटे हे करीत आहेत.

Web Title: Shocking; 25-year-old woman tortured by youth; Incidents on Mars