धक्कादायक; ६५ वर्षीय वृध्दाने केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 14:47 IST2020-01-11T14:43:21+5:302020-01-11T14:47:04+5:30

सोलापुरातील घटना; खाऊचे आमिष दाखवून केला अत्याचार

Shocking; 2-year-old girl abused by minor girl | धक्कादायक; ६५ वर्षीय वृध्दाने केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार

धक्कादायक; ६५ वर्षीय वृध्दाने केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार

ठळक मुद्दे- मुलीला खाऊचे आमिष दाखविले अन केला अत्याचार- विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल- अधिकचा तपास शहर पोलीस करीत आहेत

सोलापूर : अल्पवयीन मुलीला खाऊचे अमिष दाखवून अत्याचार केल्याप्रकरणी ६५ वर्षाच्या वृद्धावर विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

धनसिंग जाधव (वय ६५ रा. सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. अल्पवयीन मुलगी ही शुक्रवारी दुपारी २ वाजता घरासमोर खेळत होती, तेव्हां धनसिंग जाधव याने तिला जवळ बोलावले. तुला खाऊ देतो असे सांगुन एका ठिकाणी नेले, तेथे तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार शेजारच्यांनी पाहिला, त्यांनी आजुबाजुच्या लोकांना सांगितले.

लोकांनी मुलीला जवळ बोलावुन घेतले व तिच्याकडे विचारणा केली तेव्हा धनसिंग जाधव हा अश्लील चाळे करीत होता असे सांगितले. मुलीच्या आईने विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस तपास करीत आहेत. 

 

Web Title: Shocking; 2-year-old girl abused by minor girl