Video:...अन् शिवसेना नेत्याची कॉलर धरून पोलिसांनी खेचत व्हॅनमध्ये नेले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2020 13:35 IST2020-07-10T12:57:52+5:302020-07-10T13:35:48+5:30
दुचाकीवर डबल सीट जाताना पोलिसांनी पकडले; पोलिसांनी पकडलेली गाडी सोडविण्यासाठी झाला वाद

Video:...अन् शिवसेना नेत्याची कॉलर धरून पोलिसांनी खेचत व्हॅनमध्ये नेले!
सोलापूर : शिवसेनेचे कामगार नेते विष्णू कारमपुरी यांनी डबल सीट गाडी सोडविण्याच्या कारणावरून पोलिसांची हुज्जत घातली. त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
दरम्यान, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या आदेशानुसार कोरोना चा संसर्ग रोखण्यासाठी सोलापूर शहर व जिल्ह्यात दुचाकीवर डबलसीट जाणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करण्यात येत आहे. मागील काही दिवसांपासून सोलापूर शहर पोलिसांकडून शहरातील विविध भागात डबल शीट वाहनधारकांवर कारवाई करण्यात येत आहे.
शुक्रवारी शिवसेनेचे कामगार नेते विष्णू कारमपुरी हे दुचाकीवरून डबल सीट जात असताना पोलिसांनी त्यांना अडविले, त्यावेळी पोलीस व कारमपुरी यांच्या वादावादी झाली, त्यानंतर पोलिसांनी कारमपुरी यांना ताब्यात घेतले.