शरद पवार यांचे राजकारण संपविणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2019 07:50 IST2019-03-31T07:50:10+5:302019-03-31T07:50:34+5:30

चंद्रकांत पाटील । सांगोल्यात कार्यकर्त्यांची बैठक

 Sharad Pawar's politics will end | शरद पवार यांचे राजकारण संपविणार

शरद पवार यांचे राजकारण संपविणार

सांगोला (जि़ सोलापूर): बोटावर मोजण्याइतक्या खासदाराच्या जीवावर देशात राष्ट्रीय पक्ष म्हणून मिरवणाऱ्या आणि केंद्रीय राजकारणात सतत लुडबुड करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पश्चिम महाराष्ट्रातील बालेकिल्ला उद्धवस्त करुन शरद पवार यांचे राजकारण संपविणार, असा इशारा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला.

माढा लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रचारार्थ सांगोला येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. चंद्रकांत पाटील म्हणाले, माढा मतदार संघातून पराभवाची चाहूल लागल्यामुळेच शरद पवार यांनी माघारी घेत संजय शिंदे यांना बळीचा बकरा बनविला आहे. गतवेळेच्या निवडणुकीत विरोधात असणारे मोहिते-पाटील कुटुंबिय व अ‍ॅड. शहाजीबापू पाटील यंदाच्या निवडणुकीत महायुतीसोबत आहेत. उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी राष्ट्रवादीवर टीका करत दुष्काळग्रस्त जनतेच्या भावनेशी खेळणाºया बारामतीकरांना व राष्ट्रवादीला आगामी निवडणुकीत आपण जागा दाखवून देणार असल्याचे सांगितले.

नेत्यांची व्यासपीठावर कुजबूज
महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे मार्गदर्शन करण्यासाठी उभारल्यानंतर व्यासपीठावर नेत्यांची एकमेकांमध्ये कुजबूज सुरू झाली़ डझनभर नेत्यांपैकी कोणीही चंद्रकांत पाटील काय बोलतात किंवा त्यांच्या बोलण्याला कार्यकर्त्यामधून कसा प्रतिसाद मिळतो, हे कोणीही पाहताना दिसून आले नाही़

Web Title:  Sharad Pawar's politics will end