शरद पवार रविवारी सोलापूर जिल्ह्याच्या दौºयावर; ‘कोरोना’बाबतचा आढावा घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 15:31 IST2020-07-17T15:25:29+5:302020-07-17T15:31:06+5:30

माहिती संकलित करण्यासाठी प्रशासनाची धावपळ; पवारांच्या दौºयाची सविस्तर माहिती लवकरच जाहीर होणार

Sharad Pawar on a visit to Solapur district on Sunday; Review of Corona | शरद पवार रविवारी सोलापूर जिल्ह्याच्या दौºयावर; ‘कोरोना’बाबतचा आढावा घेणार

शरद पवार रविवारी सोलापूर जिल्ह्याच्या दौºयावर; ‘कोरोना’बाबतचा आढावा घेणार

ठळक मुद्दे- सोलापूर शहर व पाच तालुक्यातील ३१ गावात संचारबंदी- शरद पवार कोरोना संदर्भात आढावा घेऊन उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करणार- आरोग्य विभागाची माहिती संकलित करण्यासाठी प्रशासनाची धावपळ

सोलापूर : जिल्ह्यातील कोरोना बाबतच्या कामांचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार रविवारी सोलपुरात येत असल्याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी दिली.

 सोलापूर शहरात आणि जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. शहरासह जिल्ह्यातील ३१ गावांमध्ये पुन्हा संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. सोलापुरात संचारबंदी का जाहीर केली याची माहिती शरद पवारांनी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून मागवली होती.

सोलापूर जिल्ह्यात गेल्या चार महिन्यात प्रशासनाने केलेल्या कामाचा आढावा घेण्यासाठी आणि पुढील उपाययोजनांची माहिती घेण्यासाठी ते रविवारी सोलापुरात येत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनात माहिती संकलनाची धावपळ सुरू होती. पवारांच्या दौºयाची सविस्तर माहिती लवकरच जाहीर करू असेही साठे यांनी सांगितले.




 

Web Title: Sharad Pawar on a visit to Solapur district on Sunday; Review of Corona