"अजित पवारांना पहिल्यांदा कुणी निवडून आणलं, त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देण्याची गरज नाही"

By बाळकृष्ण दोड्डी | Updated: January 20, 2024 13:52 IST2024-01-20T13:51:10+5:302024-01-20T13:52:00+5:30

सोलापूर दौऱ्यावर असताना शरद पवारांचे वक्तव्य

Sharad Pawar said Who elected Ajit Pawar in the first place no need to pay attention to his words | "अजित पवारांना पहिल्यांदा कुणी निवडून आणलं, त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देण्याची गरज नाही"

"अजित पवारांना पहिल्यांदा कुणी निवडून आणलं, त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देण्याची गरज नाही"

बाळकृष्ण दोड्डी, सोलापूर: अजित पवारांना पहिल्यांदा कुणी तिकीट दिलं, त्यांना कुणी निवडून आणलं, असा सवाल करीत अजित पवार सध्या काहीही बोलत आहेत. त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देण्याची गरज नसल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार यांनी व्यक्त केले. शरद पवार हे सोलापूर दौऱ्यावर आहेत. माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त आयाेजित कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली. त्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

अजित पवार हे शरद पवारांच्या वयाबद्दल वारंवार बोलत असून तरुणांना संधी मिळत नसल्याचा आरोप त्यांच्याकडून होत आहे. याबाबत शरद पवार यांना प्रश्न विचारल्यानंतर अजित पवार काहीही बोलतात. त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नसल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र सरकार ईडीचा वापर हत्यार म्हणून करीत आहे. सरकार ईडीच्या माध्यमातून दशहत निर्माण करीत आहे, अशी टीका देखील या वेळी शरद पवार यांनी केली.

Web Title: Sharad Pawar said Who elected Ajit Pawar in the first place no need to pay attention to his words