शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
2
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
3
हैदराबादमध्ये पावसाचं थैमान! SRH vs GT सामना रद्द झाल्यास संपुष्टात येईल RCB चं आव्हान?
4
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
5
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
6
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
7
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
8
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
9
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
10
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
11
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
12
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
13
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
14
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
15
Blog: इरफान पठाणला बोलायला काय जातंय! परदेशी खेळाडू नसतील तर IPL मध्ये मजा राहील का?
16
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
17
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा
18
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
19
T20 WC पूर्वी भारतीय संघाच्या सराव सामन्याची तारीख व संघ ठरला! जाणून घ्या अपडेट्स 
20
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट

सोलापूरच्या एनटीपीसीमुळे २ अंशाने तापमान घटण्याचा प्रशासनाचा दावा, खा़ शरद बनसोडे यांनी घेतला आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 4:26 PM

फताटेवाडी येथील एनटीपीसीमुळे सोलापूरच्या तापमानात कसलीही वाढ होणार नाही़ याउलट परिसरातील उपाययोजनांमुळे २ अंशाने तापमानाची घट होईल, असा दावा एनटीपीसीचे महाप्रबंधक नव कुमार सिन्हा यांनी केला आहे़ मात्र, त्यासाठी पाच वर्षे वाट पाहावी लागेल, अशी पुष्टी त्यांनी जोडली़ 

ठळक मुद्देसोलापूरचे खासदार अ‍ॅड़ शरद बनसोडे यांनी आज एनटीपीसी प्रकल्पाला भेट दिली़अ‍ॅड़ शरद बनसोडे त्यांच्या हस्ते इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनचा कोनशिला समारंभपर्यावरण अनुकूलतेला प्रोत्साहन देण्यासाठी या चार्जिंग स्टेशनची स्थापना

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २८ : फताटेवाडी येथील एनटीपीसीमुळे सोलापूरच्या तापमानात कसलीही वाढ होणार नाही़ याउलट परिसरातील उपाययोजनांमुळे २ अंशाने तापमानाची घट होईल, असा दावा एनटीपीसीचे महाप्रबंधक नव कुमार सिन्हा यांनी केला आहे़ मात्र, त्यासाठी पाच वर्षे वाट पाहावी लागेल, अशी पुष्टी त्यांनी जोडली़ सोलापूरचे खासदार अ‍ॅड़ शरद बनसोडे यांनी आज एनटीपीसी प्रकल्पाला भेट दिली़ त्यांच्या हस्ते इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनचा कोनशिला समारंभ पार पडला़ पर्यावरण अनुकूलतेला प्रोत्साहन देण्यासाठी या चार्जिंग स्टेशनची स्थापना करण्यात येत आहे़ महाप्रबंधक नव कुमार सिन्हा यांनी खा़ शरद बनसोडे यांचे स्वागत केले़ एनटीपीसीच्या पहिल्या युनिटमधून वीजनिर्मिती सुरू आहे़ प्रकल्पाच्या सद्यस्थितीचा आढावा घेताना सिन्हा यांनी एनटीपीसीमुळे तापमानात वाढ होण्याच्या कथित चर्चेला छेद दिला़ ते म्हणाले, उजनी जलाशयातून एनटीपीसीसाठी पाणीसाठा करण्यात आला आहे़ त्यामुळे परिसरात पाण्याची पातळी वाढली असून, चोहो बाजूंनी हिरवळ आणि पिके वाढली आहेत़ प्रकल्पस्थळी १ लाख ३२ हजार वृक्षांची लागवड करण्यात आली आहे़ या स्थितीमुळे तापमानात निश्चित घट होणार आहे़ रामगुंडम येथील प्रकल्पात वृक्षराजीमुळे ३ अंशाने तापमान घटल्याचा अनुभव त्यांनी सांगितला़ यावेळी बोलताना खा़ बनसोडे यांनी एनटीपीसीच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त केले़ प्रकल्पाचा दुसरा टप्पा मे २०१९ मध्ये कार्यान्वित होणार आहे़ या प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाचारण करणार असल्याची माहिती त्यांनी दिली़ याप्रसंगी एनटीपीसीचे वरिष्ठ अधिकारी डी़ पॉल, एस़ के़ सत्या, हेमंत शिंदे, टी़ प्रेमदास आदी उपस्थित होते़ 

टॅग्स :Solapurसोलापूरmahavitaranमहावितरण