शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
2
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
3
इकडे PM मोदींचा सज्जड दम, तिकडे सांबा येथे दिसले संशयित ड्रोन; भारतीय सैन्याकडून कारवाई सुरू
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने शरणागती पत्कारल्यानंतर भारताने युद्धविरामाला सहमती दर्शवली- फडणवीस
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

सोलापूर पोलीस अधीक्षकांच्या रडारवर सात हजार आरोपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 14:41 IST

८७ गँगची घेतली माहिती : जिल्ह्यात तडीपार, एमपीडीए व मोक्का अंतर्गत होणार कारवाई

ठळक मुद्देजिल्ह्यातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी विशेष मोहीमजिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी ग्रामीण हद्दीतील ६ हजार ९२६ गुन्हेगारांची यादीजिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधून ८७ गँगची माहिती

सोलापूर : जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी ग्रामीण हद्दीतील ६ हजार ९२६ गुन्हेगारांची यादी करण्यात आली आहे. गुन्हेगारांवर प्रत्येकी दोन गुन्हे दाखल आहेत. त्यांनी तिसरा गुन्हा केल्यास त्यांच्यावर कायद्याने तडीपार, एमपीडीए व मोक्का अंतर्गत कारवाई केली जाणार आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधून ८७ गँगची माहिती घेण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

जिल्ह्यातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी विशेष मोहीम राबविली जात आहे. गुन्ह्याचे पाच प्रकार तयार करण्यात आले असून, त्यात शरीराविरुद्ध गुन्हा, मालमत्ताविरुद्ध गुन्हा, दारूबंदी व मटकाविरुद्ध गुन्हा, अवैध वाळूविरुद्ध गुन्हा असलेल्यांची यादी केली आहे. या आरोपींच्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 

एखादी व्यक्ती गुन्हेगाराची माहिती देण्यासाठी येत असताना तो दहशतीखाली असतो. सर्वसामान्य माणसांना गुन्हेगारांच्या विरोधात फिर्याद देता यावी म्हणून पोलीस खात्याकडून पूर्ण सहकार्य करणार आहेत. गुुन्हेगारांना आगामी काळात गुन्ह्यांपासून रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. शरीराविरुद्धच्या गुन्ह्यात २ हजार २२, मालमत्ताविरोधी गुन्ह्यात ६६२, जुगार व मटका प्रकरणातील ९७३ गुन्हेगारांची, दारूबंदीमधील २ हजार ९३६ तर वाळू प्रकरणातील ३३३ गुन्हेगारांची संपूर्ण माहिती गोळा करण्यात आली आहे. याशिवाय जिल्ह्यातील ८७ गँगचीही माहिती घेण्यात आली असून, या सर्व गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्यात आले आहे. सध्या ६३६ गुन्हेगारांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. पंढरपूर व बार्शी येथील गँगची संपूर्ण माहिती घेण्यात आली असून, संबंधितांवर कोणती कारवाई  केली जाईल याचा अभ्यास केला जात आहे,  असेही यावेळी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले. 

बेकायदा वाळू वाहतुकीवर करडी नजर- वाळूसंदर्भात १८ कॉलमचे एक रजिस्टर करण्यात आले असून, प्रत्येक पोलीस स्टेशनकडे देण्यात येणार आहे. पोलिसांनी पकडलेल्या गाडीला व वाळूला दंड केला जात आहे. दंड आकारून त्याचा अहवाल उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे पाठविला जातो. ओव्हरलोड तपासून दंड आकारला जाता. या सर्व नोंदी रजिस्टरमध्ये नियमित ठेवल्या जाणार आहेत. पोलिसांनी सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवला आहे, या व्यवसायातील लोकांनी बेकायदा वाळू व्यवसाय करू नये, अन्यथा सर्वांना कायद्याने मोठ्या कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही यावेळी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिला आहे. 

महाराष्ट्रात ग्रामीण पोलिसांचा दुसरा क्रमांक- सीसीटीएनएस (क्राईम क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्किंग सिस्टीम) मध्ये अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत. अशा तपासात सोलापूरच्या ग्रामीण पोलिसांचा महाराष्ट्रात दुसरा क्रमांक आला आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितली.

टॅग्स :SolapurसोलापूरPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस