सोलापुरातील स्वयंसेवी संस्थांचे फेडरेशन स्थापन करणार : सहकारमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 11:02 AM2018-11-10T11:02:53+5:302018-11-10T11:06:54+5:30

सोशल फाउंडेशनची बैठक : संस्थांना पारदर्शकता ठेवण्याचे आवाहन

To set up a federated organization of NGOs in Solapur: Cooperative Minister | सोलापुरातील स्वयंसेवी संस्थांचे फेडरेशन स्थापन करणार : सहकारमंत्री

सोलापुरातील स्वयंसेवी संस्थांचे फेडरेशन स्थापन करणार : सहकारमंत्री

googlenewsNext
ठळक मुद्देसोलापूर सोशल फाउंडेशनच्या वतीने शासकीय विश्रामगृह येथे सोलापूर शहर-जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्थांची बैठकस्वयंसेवी संस्थांचे जिल्हास्तरीय फेडरेशन करून त्याच्या माध्यमातून प्रश्न सोडवू - सहकारमंत्री

सोलापूर : सोलापूरचा विकास करण्यासाठी अनेक सकारात्मक विषय आपल्यासमोर आहेत. त्यासाठी सोलापूर जिल्ह्यात सामाजिक, आर्थिक व ग्रामीणस्तरावर काम करणाºया छोट्या-मोठ्या स्वयंसेवी संस्थांचे संघटन केले पाहिजे. त्यांच्या माध्यमातून सोलापूरचे अनेक प्रश्न सोडवू शकतो. भविष्यात विकासात्मक मोठे काम उभे राहण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात काम करणाºया स्वयंसेवी संस्थांचे जिल्हास्तरीय फेडरेशन करून त्याच्या माध्यमातून प्रश्न सोडवू, असे मत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी व्यक्त केले. 

सोलापूर सोशल फाउंडेशनच्या वतीने शासकीय विश्रामगृह येथे सोलापूर शहर-जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्थांची बैठक आयोजित केली होती. सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. यावेळी सोलापूर सोशल फाउंडेशनचे संचालक अभिजित पाटील, मिलिंद भोसले, अमोल उंबरजे, तज्ज्ञ सुलक्षणा पवार, नगरसेवक राजेश काळे, मुख्य समन्वयक दत्तात्रय चौगुले उपस्थित होते. 

सोलापूर बाहेरचे जे चांगले आहे ते सोलापुरात आणण्याचा प्रयत्न करीत आहे. आज गाव, शहर स्तरावर अनेक स्वयंसेवी संस्था काम करतात. त्यांच्यात संघटन घडविल्यास अनेक मोठी कामे होतील. या उद्देशाने अल्पावधीतच सोलापूर जिल्ह्यात विविध क्षेत्रात काम करणाºया स्वयंसेवी संस्थांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीतून आपसांतील समस्या, कामाची पद्धत, सीएसआर मिळविण्यासाठी नियमावली आदींबाबत माहिती देण्यासाठी ही बैठक आयोजित केली होती. 

याप्रसंगी सोलापूर सोशल फाउंडेशनचे संचालक अभिजित पाटील यांनीही उपस्थित संस्थांना माहिती दिली. संस्थांनी आपला लेखाजोखा चांगला ठेवावा. अनेक उद्योगपतींना, प्रसिद्ध व्यक्तींना सामाजिक काम करणाºया संस्थांसाठी निधी द्यावयाचा असतो, पण संस्थांनी आपली माहिती पारदर्शक दिल्यास मदत मिळते. त्यामुळे संस्थांनी आपली माहिती, आर्थिक ताळेबंद पारदर्शक ठेवावा. आपल्या मूल्यांना तडे जाऊ न दिल्यास नक्कीच संस्थेचे भविष्य उज्ज्वल बनेल, असे मत संचालक अभिजित पाटील यांनी व्यक्त केले. 

 याप्रसंगी अमोल उंबरजे, सुलक्षणा पवार यांनी उपस्थित स्वयंसेवी संस्थांच्या पदाधिकाºयांना संस्थेचा कारभार कसा ठेवावा, सीएसआर कसा मिळवावा याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी सोलापुरातील जयहिंद फूड बँक, लोकमंगल फाउंडेशन तर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातून अनेक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सोलापूर जिल्ह्यासह शहरातील अनेक स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.

Web Title: To set up a federated organization of NGOs in Solapur: Cooperative Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.