काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे अजितदादा गटातील माजी आमदाराच्या भेटीला

By राकेश कदम | Published: October 20, 2023 03:51 PM2023-10-20T15:51:09+5:302023-10-20T15:51:23+5:30

लोकसभा निवडणुकीची तयारी: बेरजेच्या राजकारणाची चर्चा 

Senior Congress leader Sushil Kumar Shinde met former MLA from Ajitdada group | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे अजितदादा गटातील माजी आमदाराच्या भेटीला

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे अजितदादा गटातील माजी आमदाराच्या भेटीला

सोलापूर - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि आमदार प्रणिती शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून सुशीलकुमार शिंदे यांनी मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांची शुक्रवारी भेट घेतली.‌ त्यांच्यासोबत स्नेहभोजन केले. राजन पाटील हे सध्या राष्ट्रवादीचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत आहेत हे विशेष.

सोलापूर लोकसभा मतदारसंघात मोहोळ तालुक्याचा समावेश आहे.‌ राजन पाटील हे काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर ते अजितदादांच्या बाजूने गेले. सुशीलकुमार शिंदे आणि राजन पाटील यांचेही अनेक वर्षांपासूनचे ‌संबंध आहेत. या जुन्या स्नेह संबंधांमुळे शिंदे यांनी राजन पाटील यांची भेट घेतल्याचे काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी सांगितले. राजन पाटील यांचे पुत्र बाळराजे पाटील आणि अजिंक्यराणा पाटील यांनी शिंदे यांचे स्वागत केले.

ही भेट वैयक्तिक होती. त्यामुळे याचा राजकीय अर्थ काढू नये असे राजन पाटील यांनी सांगितले.

Web Title: Senior Congress leader Sushil Kumar Shinde met former MLA from Ajitdada group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.