पंढरपुरात बंदोबस्त वाढवला, एसटी बस सेवाही राहणार बंद, वारकरी सेनेचे आज आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 06:30 AM2020-08-31T06:30:55+5:302020-08-31T06:31:13+5:30

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात वारकऱ्यांना योग्य तो नियम, अटींच्या अधीन राहून भजन, कीर्तन करण्यास परवानगी द्यावी. मंदिर भाविकांना दर्शनासाठी उघडे ठेवावे.

Security has been beefed up in Pandharpur, ST bus service will also be closed, Warkari Sena's agitation today | पंढरपुरात बंदोबस्त वाढवला, एसटी बस सेवाही राहणार बंद, वारकरी सेनेचे आज आंदोलन

पंढरपुरात बंदोबस्त वाढवला, एसटी बस सेवाही राहणार बंद, वारकरी सेनेचे आज आंदोलन

Next

पंढरपूर (जि. सोलापूर) : श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेचे मंदिर भाविकांसाठी खुले करावे, या मागणीसाठी विश्व वारकरी सेना, बहुजन वंचित आघाडीकडून ३१ आॅगस्टला होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला असून एसटी बससेवा ३६ तासासाठी बंद करण्यात आली आहे.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात वारकऱ्यांना योग्य तो नियम, अटींच्या अधीन राहून भजन, कीर्तन करण्यास परवानगी द्यावी. मंदिर भाविकांना दर्शनासाठी उघडे ठेवावे. त्याचबरोबर इतर मागण्यांसाठी ‘चलो पंढरपूर’ असा नारा देऊन किमान एक लाख वारकरी पंढरपूर येथे विठ्ठल मंदिरासमोर ठिय्या आंदोलन करणार असल्याचे जाहीर आवाहन केले आहे.
वंचित बहुजन आघाडीचे
अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पाठिंबा दिला आहे. यामुळे
त्यांनीही कार्यकर्ते, पदाधिकाºयांना पंढरपुरात येण्याचे आवाहन केले आहे. बळीराजा शेतकरी संघटनेने देखील या आंदोलनास पाठिंबा दिला आहे. या आंदोलनास मोठ्या प्रमाणात आंदोलनकर्ते येण्याची शक्यता आहे.

Web Title: Security has been beefed up in Pandharpur, ST bus service will also be closed, Warkari Sena's agitation today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.