पाेलिसांच्या आपसातील गटबाजीमुळे सामान्यांची सुरक्षा धाेक्यात; आशिष शेलारांची टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 17:06 IST2021-08-23T17:05:56+5:302021-08-23T17:06:01+5:30
भाजप नेते आशिष शेलार यांची टीका - साेलापुरात काेअर कमिटीच्या बैठका

पाेलिसांच्या आपसातील गटबाजीमुळे सामान्यांची सुरक्षा धाेक्यात; आशिष शेलारांची टीका
साेलापूर - महाआघाडी सरकारचा पाेलिसांवरील वचक निघून गेला. पाेलिसांच्या आपसातील गटबाजीमुळे हा विभाग पाेखरला असून सर्वसामान्य माणसांची सुरक्षा धाेक्यात आली, अशी भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी साेमवारी केली.
आगामी महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हाेणाऱ्या भाजपच्या काेअर कमिटी बैठकीसाठी आमदार शेलार साेमवारी शहरात आले. छत्रपती संभाजी महाराज चाैकात शहराध्यक्ष विक्रम देशमुख, महापाैर श्रीकांचना यन्नम यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी आमदार शेलार म्हणाले, महाआघाडी सरकारच्या काळात सर्वसामान्य लाेक असुरक्षित आहेत. केवळ मंत्र्यांच्या मुलांना सुरक्षा पुरविली जात आहे. पाेलिस दलावर वचक राहिलेला नाही. राज्यात दहिहंडी उत्सव करण्यास परवानगी दिली पाहिजे. काेराेना लसीचे दाेन डाेस घेतलेल्या लाेकांना पारंपरिक पध्दतीने दहिहंडी उत्सव साजरा करण्यास परवानगी द्यावी. परवानगी न दिल्यास आंदाेलन करु.
यावेळी महापालिका परिवहन समितीचे सभापती जय साळुंखे, माजी महापाैर शाेभा बनशेट्टी, शहर संघटन सरचिटणीस रुद्रेश बाेरामणी, सरचिटणीस बिज्जू प्रधाने, संजय काेळी, इंदिरा कुडक्याल, मेनका राठाेड, राजकुमार पाटील आदी उपस्थित हाेते.