सोलापूर जिल्ह्यातील १०२० शाळा झाल्या सुरू; पंढरपूर, सोलापूरमधील बहुतांश शाळा बंदच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 15:59 IST2020-11-26T15:57:57+5:302020-11-26T15:59:41+5:30
१०२० शाळा सुरू: अक्कलकोट, मंगळवेढा, माळशिरसमधील सर्व वर्ग सुरू

सोलापूर जिल्ह्यातील १०२० शाळा झाल्या सुरू; पंढरपूर, सोलापूरमधील बहुतांश शाळा बंदच
सोलापूर : नववी ते बारावी वर्ग सुरू करण्याच्या शासनाच्या प्रस्तावाला सोलापूर जिल्ह्याती चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तिसºया दिवशी म्हणजे बुधवारी केवळ ६७ शाळा बंद होत्या. १०२० शाळांमधील वर्ग सुरू झाले असून, यामध्ये अक्कलकोट, मंगळवेढा व माळशिरस तालुक्यातील सर्व शाळा सुरू झाल्या आहेत.
जिल्ह्यातील १ हजार ८७ माध्यमिक शाळांपैकी १ हजार २० शाळांचे वर्ग सुरू झाले आहेत. उर्वरित ६७ शाळांपैकी पंढरपूर शहर परिसरातील २५ शाळा आहेत. कार्तिकी वारीनिमित्त जिल्हा प्रशासनाने संचारबंदी लागू केल्याने या शाळा सुरू होण्याला विलंब लागला आहे. त्याखालोखाल सोलापूर शहरातील २२ शाळा बंद आहेत. कोरोना चाचणीचे अहवाल प्रलंबित, पालकांची संमती नाही व शिक्षक पॉझिटिव्ह अशा कारणाने या शाळा सुरू होण्याला विलंब होत असल्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर यांनी सांगितले.
अशी आहे शाळांची स्थिती
तालुका एकूण शाळा सुरू शाळा बंद शाळा
- सोलापूर शहर १५४ १३२ २२
- उत्तर सोलापूर ७९ ७४ ५
- दक्षिण सोलापूर ७२ ६७ ५
- मोहोळ ६६ ६५ १
- मंगळवेढा ५५ ५५ ०
- पंढरपूर १२२ ९७ २५
- सांगोला ८७ ८४ ३
- माळशिरस ९५ ९५ ०
- करमाळा ५७ ५५ २
- माढा १०० ९८ २
- बार्शी १२३ १२१ २