शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

शाळा, महाविद्यालये, सिनेमागृहे, जलतरण तलाव ३१ ऑक्टोबरपर्यंत राहणार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2020 3:04 PM

जिल्हाधिकारी शंभरकर यांचे आदेश जारी; ५ ऑक्टोबरपासून हॉटेल व्यवसाय सुरू राहणार

ठळक मुद्देकामाच्या ठिकाणी जास्तीत जास्त आस्थापनांनी कर्मचा?्यांकडूवन घरातून काम करून घ्यावेकार्यालये, दुकाने, मार्केट, औद्योगिक आस्थापनामध्ये कामाच्या वेळेत पुरेसे अंतर असावेस्क्रिनिंग आणि स्वच्छता यावर भर द्यावा. शिफ्ट बदलताना वारंवार स्वच्छता, सॅनिटायझरचा वापर करावा

 सोलापूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, संसर्ग कमी करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात (पोलीस आयुक्तालय हद्द वगळून) लॉकडाऊनचे निर्बंध ३१ ऑक्टोबर २०२० पर्यंत वाढविण्यात आले आहेत. या काळात शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, शिकवणी वर्ग बंद, सिनेमागृहे, जलतरण तलाव, मनोरंजन केंद्रे, थिअटर्स बंद राहणार आहेत. याबाबत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आदेश जारी केले आहेत.

यापूर्वी ज्या उपक्रमाला वेळोवेळी सशर्त परवानगी देण्यात आली होती, ते यापूर्वीप्रमाणे लागू राहतील. कोविड-19 व्यवस्थापनासाठी राष्ट्रीय निदेर्शाचे पालन करणे आवश्यक असून दोषीविरूद्ध दंडात्मक कार्यवाही करण्यात येणार आहे. सार्वजनिक, कामाच्या ठिकाणी आणि प्रवासामध्ये चेह?्यावर मास्कचा वापर करणे बंधनकारक आहे. सार्वजनिक ठिकाणी सहा फुटांचे सुरक्षित अंतर ठेवावे, पाचपेक्षा अधिक ग्राहकांना दुकानात येण्यास परवानगी देऊ नये. मोठ्या सार्वजनिक मेळाव्यावर बंदी असेल. विवाहस्थळी 50 नागरिकांना एकत्र येण्यास परवानगी असेल, अंत्ययात्रेला 20 नागरिकांना एकत्र येऊ शकतील. सार्वजनिक ठिकाणी थुकण्यास बंदी असून दारू, पान, गुटखा, तंबाखूचे सेवनावर कडक निर्बंध असणार आहेत, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी शंभरकर यांनी जारी केलेल्या आदेशानुसार संचारबंदी काळात काय बंद राहणार, सुरू राहणार याबाबतचा तपशील पुढीलप्रमाणे.

काय बंद राहणार

  • - शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, शिकवणी वर्ग बंद. मात्र ऑनलाईन/दूरस्थ शिक्षणाला परवानगी.
  • -सिनेमागृहे, जलतरण तलाव, मनोरंजन केंद्रे, थिअटर्स (मॉलमधील व बाजार संकुलातील थिअटर्ससह), सभागृहे.
  • -सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम व सभा.
  • - केंद्रीय गृह मंत्रालयाने परवानगी दिलेले प्रवाशी वगळून आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासास बंदी.

काय सुरू राहणार

  • -सर्व अत्यावश्यक सेवेची दुकाने/आस्थापना यापूर्वीच्या आदेशात नमूद केलेल्या निदेर्शानुसार सुरू.
  • -यापूर्वी वेळोवेळी चालू करण्यास मान्यता दिलेले उपक्रम यापुढेही चालू राहतील.
  • हॉटेल, फुड कोर्ट, रेस्टॉरंट, बार यांना 5 ऑक्टोबर 2020 पासून एकूण क्षमतेच्या 50 टक्के. स्थानिक प्रशासनाच्या मान्यतेनुसार परवानगी. आवश्यक त्या उपाययोजनाबाबत महाराष्ट्र पर्यटन विभाग मानक कार्यपद्धती निश्चित करेल.
  • -आॅक्सिजनची वाहतूक करणारी वाहने राज्यात व राज्याबाहेर वेळेच्या बंधनाशिवाय मुक्तपणे वाहतूक. आॅक्सिजन उत्पादक कारखान्यांना व पुरवठाधारक/वितरकांना बंधने असणार नाहीत.
  • -केंद्र/ राज्य शासनाने कोविड-19 बाबत दिलेल्या निदेर्शांचे पालन करून राज्यातून सुरू होणा?्या व संपणा?्या सर्व रेल्वे तत्काळ सुरू होतील.

    कामाच्या ठिकाणी जास्तीत जास्त आस्थापनांनी कर्मचा?्यांकडूवन घरातून काम करून घ्यावे. कार्यालये, दुकाने, मार्केट, औद्योगिक आस्थापनामध्ये कामाच्या वेळेत पुरेसे अंतर असावे. स्क्रिनिंग आणि स्वच्छता यावर भर द्यावा. शिफ्ट बदलताना वारंवार स्वच्छता, सॅनिटायझरचा वापर करावा. कामगारांमध्ये सुरक्षित अंतर असेल, याची खबरदारी घ्यावी, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.  आदेशाचे उल्लंघन करणाºया व्यक्ती, संस्था, संघटना यांच्यावर कलम 188 आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ नुसार कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे, त्याचबरोबर प्रतिबंधित सांसर्गिक क्षेत्रामध्ये (कंटेन्मेट झोन) यापूर्वी देण्यात आलेले आरोग्यविषयक आदेश लागू राहतील. 

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय