शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

टंचाई परिस्थिती; गतवर्षीच्या तुलनेत यंदा उजनीत ३३ टीएमसी पाणी कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 12:54 IST

सोलापूर : कमी पर्जन्यमानामुळे उजनी धरणातील पाणीसाठा संपुष्टात येत आहे. गतवर्षीच्या तुलनेत रविवारी उजनी धरणात तब्बल ३३ टीएमसी पाणीसाठा ...

ठळक मुद्दे जिल्ह्यातील सात मध्यम प्रकल्पाच्या तलावातील पाणीही शून्य टक्क्यावरउजनी धरणात तब्बल ३३ टीएमसी पाणीसाठा कमी झाला कमी पर्जन्यमानामुळे उजनी धरणातील पाणीसाठा संपुष्टात येत आहे

सोलापूर : कमी पर्जन्यमानामुळे उजनी धरणातीलपाणीसाठा संपुष्टात येत आहे. गतवर्षीच्या तुलनेत रविवारी उजनी धरणात तब्बल ३३ टीएमसी पाणीसाठा कमी झाला आहे. मागील वर्षी यादरम्यान धरणात १०३ टीएमसी पाणी होते. रविवारी मात्र केवळ ७०.४४ टीएमसी पाणी होते. जिल्ह्यातील सात मध्यम प्रकल्पाच्या तलावातील पाणीही शून्य टक्क्यावर आल्याने या तलावात ठणठणाट दिसून येत आहे.

उजनी धरणाची प्रकल्पीय पाणीसाठा ३३२0 दशलक्ष घनमीटर इतकी आहे. या प्रकल्पात १५१७ दशलक्ष घनमीटर इतका उपयुक्त पाणीसाठा असतो. रविवारी धरणात केवळ ६.७८ टीएमसी इतकाच उपयुक्त पाणीसाठा होता. गतवर्षी याच दिवशी ४0 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा धरणात होता. बाष्पीभवनामुळे पाण्याच्या पातळीत वेगाने घट होत असून, त्यामुळे भविष्यकालीन पाणी वाटप नियोजनावर गंभीर परिणाम होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. 

जवळगाव प्रकल्पाची ३४.९२ दशलक्ष घनमीटर इतकी प्रकल्पीय पाणीसाठा मर्यादा आहे. यात आता ५.७३ दशलक्ष घनमीटर म्हणजे 0.२0 टीएमसी इतकाच पाणीसाठा राहिला आहे. मांगी प्रकल्पाची ३0.७२ दशलक्ष घनमीटर इतकी प्रकल्पीय मर्यादा आहे. यंदाच्या वर्षी १ दशलक्ष घनमीटर म्हणजे 0.0४ टीएमसी इतकाच पाणीसाठा असल्याने हा प्रकल्प कोरडा पडला असल्याचे दिसून येते. आष्टी प्रकल्पाची पाणीसाठा मर्यादा २३.0१ दशलक्ष घनमीटर इतकी आहे. यंदाच्या वर्षी 0.८५ दशलक्ष घनमीटर म्हणजे 0.0३ टीएमसी इतकाच पाणीसाठा राहिला गेल्याने या प्रकल्पातीलही पाणी नसल्याचे स्पष्ट होत आहे. बोरी प्रकल्पाची पाणीसाठा मर्यादा २३.२९ दशलक्ष घनमीटर इतकी आहे. यंदाच्या वर्षी आतापर्यंत १.२९ दशलक्ष घनमीटर म्हणजे 0.0५ टीएमसी इतकाच पाणीसाठा राहिला आहे. पिंपळगाव ढाळे प्रकल्पाची पाणीसाठा मर्यादा १२.६६ दशलक्ष घनमीटर इतकी आहे. यंदाच्या वर्षी यात पूर्णपणे शून्य टीएमसी म्हणजेच तलाव कोरडा पडला गेला आहे. 

एकरूख प्रकल्पात ५.६३ दलघमी पाणीसाठा !एकरुख प्रकल्पाची ६१ दशलक्ष घनमीटर इतकी प्रकल्पीय पाणीसाठा आहे. या प्रकल्पात रविवारी केवळ ५.६३ दशलक्ष घनमीटर इतका म्हणजे 0.२0 टीएमसी इतकाच पाणीसाठा होता. हिंगणी प्रकल्पाचा ४५.५१ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा प्रकल्पीय आहे. यात यंदा ५.४0 दशलक्ष घनमीटर म्हणजे केवळ 0.१९ टीएमसी इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिला गेला आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरUjine Damउजनी धरणWaterपाणीwater shortageपाणीटंचाईdroughtदुष्काळ