गुड बोला.गोड बोला..! ‘गोड बोल ज्यांच्या मुखी, त्यांचेच जीवन सुखी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 11:50 IST2019-01-18T10:57:20+5:302019-01-18T11:50:24+5:30

मुखाने गोड बोलणाºया व्यक्ती नेहमी आयुष्यात माणसं जोडण्याचं  काम करतात म्हणूनच त्यांचं जीवन सुखी, निरोगी अन्  आनंदमय होते. काम, ...

Say goodbye! 'Sweet talk is the face of those, their happiness is life' | गुड बोला.गोड बोला..! ‘गोड बोल ज्यांच्या मुखी, त्यांचेच जीवन सुखी’

गुड बोला.गोड बोला..! ‘गोड बोल ज्यांच्या मुखी, त्यांचेच जीवन सुखी’

ठळक मुद्देभारतीय संस्कृतीत मकरसंक्रांत सणाला विशेष महत्त्व प्रत्येकाने आपल्या मनावर संयम  राखून रागावर नियंत्रण ठेवले तर शरीर व मन निरोगी होईल

मुखाने गोड बोलणाºया व्यक्ती नेहमी आयुष्यात माणसं जोडण्याचं  काम करतात म्हणूनच त्यांचं जीवन सुखी, निरोगी अन्  आनंदमय होते. काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर या पंचइंद्रियांवर विजय मिळवायला हवा.  अवगुणाने मनुष्य आपलं आयुष्य  दु:खी करतो. क्रोध म्हणजेच राग. रागामुळे माणसाचा स्वभाव तापट, चिडचिडा होतो. यातूनच नकळतपणे वापरलेल्या अपशब्दामुळे जवळची माणसे दुखावली जातात. 

भारतीय संस्कृतीत मकरसंक्रांत सणाला विशेष महत्त्व आहे. तीळाचा स्नेह व गुळाची गोडी आपल्या आयुष्यातही  वाढावी हेच जणू या पारंपरिक उत्सवाचं गमक आहे.  आणि ते आपण सर्वांनीच जपलं पाहिजे. 

रागामुळे  मनाबरोबरच शरीरावर परिणाम होतो. संतापलेला माणूस स्वत:च्या मनावरील नियंत्रण हरवतो. याचा स्वत:च्या आरोग्यावर विपरित  परिणाम  होतो. म्हणून प्रत्येकाने आपल्या मनावर संयम  राखून रागावर नियंत्रण ठेवले तर शरीर व मन निरोगी होईल. आयुष्य सुखकर असा, विश्वास वाटतो.  
- विजयसिंह मोहिते-पाटील
खासदार

Web Title: Say goodbye! 'Sweet talk is the face of those, their happiness is life'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.