शहरं
Join us  
Trending Stories
1
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
2
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
3
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
4
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
5
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
6
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
7
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
8
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
9
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
10
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
11
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
12
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
13
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
14
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
15
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
16
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
17
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
18
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
19
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
20
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 

सोलापुरातील संभाजी तलावाला जलपर्णीचा विळखा सुटेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 3:28 PM

शहराच्या फुफ्फुसाला धोका : इच्छाशक्तीचा अभाव, पावले उचलण्याची मागणी

ठळक मुद्देतलावामध्ये दररोज मोठ्या प्रमाणात प्रदूषित पाणी मिसळत आहेतलावाच्या अवती-भोवतालच्या परिसरातून ड्रेनेजचे पाणीधोबी घाटावर साबण, निरमा  असे केमिकल या पाण्यात मिसळत असल्याने ही जलपर्णी वेगाने वाढते

काशिनाथ वाघमारेसोलापूर : स्मार्ट सिटीला डाग ठरू पाहणाºया जलपर्णींचा विळखा संभाजी तलावाला दिवसेंदिवस वाढत चालला आहे़ सोलापूरकरांच्या दृष्टीने या अशोभनीय प्रश्नावर राजकीय इच्छाशक्तीअभावी अद्याप कायमस्वरुपी तोडगा निघालेला नाही़ हा  प्रश्न आता आणखी गंभीर झाला आहे़ शहराचे फुफ्फुस म्हणून ओळखल्या जाणाºया या तलावाला जलपर्णीमुक्त करण्यासाठी पावले उचलण्याची मागणी होत आहे.

तलावामध्ये दररोज मोठ्या प्रमाणात प्रदूषित पाणी मिसळत आहे़ तलावाच्या अवती-भोवतालच्या परिसरातून ड्रेनेजचे पाणी यात येत आहे़ तसेच धोबी घाटावर साबण, निरमा  असे केमिकल या पाण्यात मिसळत असल्याने ही जलपर्णी वेगाने वाढते आहे़ तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या केमिकलमुळे फॉस्फरसचा साठा मोठ्या प्रमाणात झाला आहे़ परिणामत: तलावातील झरे झापले जात आहेत़ तसेच ही जलपर्णी पाण्यातील आॅक्सिजन शोषून घेऊन कमी करते़ त्यामुळे जलचर प्राणीही कमी होताहेत़ तसेच धर्मवीर संभाजी तलावाला कंबर तलाव असो संबोधले जाते.

या तलावात मोठ्या प्रमाणात कमळ होते़ ही जलपर्णी वाढत गेल्यानंतर कमळ फुलेही नाहीशी झाली़ कॅन्सरप्रमाणे वाढणारी ही जलपर्णी आटोक्यात आणण्यासाठी पर्यावरण तज्ज्ञांच्या मते चोहोबाजूने दाखल होणारे दूषित पाणी थांबवावे लागेल़ धोबीघाटावरुन मिळणारे केमिकल थांबवावे लागेल़ गणेशोत्सवासह इतर काळात तलावात होणारे मूर्ती विसर्जन, निर्माल्य टाकणे थांबवावे लागणार आहे़ हरित सेनेचे विद्यार्थी, वनखात्याच्या कर्मचाºयांच्या मदतीने सातत्याने जलपर्णी बाहेर काढावी लागेल़ सतत जलपर्णी काढावी लागेल़ यामुळे ती कमीही होईल आणि तलाव स्वच्छ, नितळ राहील अशी अपेक्षा पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे़ तसेच जलपर्णीला कायमस्वरुपी संपवणाºया ‘न्यूयोचिओ टीनिया एऩ बीपरुची’ या किड्यांची पैदास करावी लागणार आहे़ हे किडे दोन वर्षांत ही जलपर्णी पूर्णत: संपवतील असे तज्ज्ञांच्या मते सांगितले जात आहे़ 

कशी आली जलपर्णी ?- १८ व्या शतकात आॅस्ट्रेलियाच्या राणीला खुश ठेवण्यासाठी राजाने ज्या-ज्या देशांमध्ये सत्ता स्थापन करता आली त्या-त्या देशांमध्ये तलावांमध्ये ही जलपर्णी वाढवली़ या जलपर्णीत उगवणारे पांढरे फूल ते राणीला आठवण म्हणून देत असत़ ही जलपर्णी अमेरिकेतील अ‍ॅमेझोन खोºयातून आॅस्ट्रेलियात आली़ तेथून भारतात पसरली़ अनेक तलावातून सोलापूरच्या संभाजी तलावात आली आणि ती वाढली़ १९ व्या शतकाच्या सुरुवातीला पक्षीतज्ज्ञ  सलीम अली सोलापूरला आले होते़ त्यावेळी ही जलपर्णी संभाजी तलावात नव्हती़ जिल्ह्यात सोलापूर शहरात एकमेव हा तलाव आहे़ यानंतर या जलपर्णीचे प्रस्थ वाढले आणि गांभीर्याचा विषय बनला आहे़

या तलावाचे सुशोभीकरण आणि स्वच्छतेसाठी विशेष निधी महापालिकेला प्राप्त होतोय. साधारण १५ दिवसांपूर्वी यासंदर्भात पालिका आयुक्तांकडून माहिती मिळाली होती आणि याचे काम पुण्याच्या दोन ठेकेदारांनी मागितल्याचेही कळले आहे़ यावर लवकरच पर्यावरणप्रेमींसोबत बैठक बोलावून सूचना मागवणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले आहे़ आमचे लक्ष तिकडेच आहे़ लवकरच तलावाचे सुशोभीकरण, सौंदर्याकरण होईल़ जलपर्णी मार्गी लावण्याबाबत पर्यावरणप्रेमीमध्ये इच्छाशक्ती आहे़ - निनाद शहा मानद वन्यजीव रक्षक, सोलापूर  

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाwater parkवॉटर पार्क