शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी संतोष पाटील

By admin | Updated: July 5, 2014 00:24 IST

मोहोळमध्ये आनंद: नरखेडला २६ वर्षांनंतर दुसऱ्यांदा मान

मोहोळ: जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी मोहोळ तालुक्यातील नरखेडचे सुपुत्र संतोष सुरेश पाटील यांची निवड करण्यात आली आहे़ ग्रामीण भागातील कार्यकर्त्याला जिल्हाध्यक्षपद मिळाल्याने सर्वत्र आनंद व्यक्त होत आहे़मुंबई येथे नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला़ लोकसभा निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांच्या दारूण पराभवानंतर काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरू झाले होते़ अध्यक्षपद कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. बाळासाहेब शेळके यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी आता संतोष पाटील यांच्याकडे सोपविण्यात आली आहे़ ------------------नरखेडला मानजिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा मान नरखेडला पुन्हा एकदा मिळत आहे़ ज्येष्ठ नेते, माजी मंत्री कै़शहाजीराव पाटील यांनी तब्बल ११ वर्षे जिल्ह्याचे नेतृत्व केले आहे़(१९७७ ते १९८८)आता सुमारे २६ वर्षांनंतर संतोष पाटील यांना संधी मिळत आहे़--------------------------श्रेष्ठींनी सोपविलेल्या जबाबदारीची जाणीव असून आपण ती योग्यरितीने पार पाडू़ आगामी विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात काँग्रेसला बळकट करण्यात येईल़ सर्वांना सोबत घेऊन जिल्हा काँग्रेसला पुनर्वैभव प्राप्त करून देऊ़- संतोष पाटील, नूतन जिल्हाध्यक्ष