शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
2
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
3
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
4
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
5
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
6
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
7
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
8
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
9
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
10
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
12
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
13
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
14
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
15
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
16
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
17
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
19
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
20
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला

कोलांटउड्या मारत संजयमामांनी सर्वात जास्त सत्ता भोगली : ढोबळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2019 12:19 PM

सोलापूरच्या सुकुमार सुपुत्रांनी कधी अंगणवाडीही काढली नाही. कार्यकर्त्याला पिठाची गिरणी काढण्याला मदत केली नाही अशीही टिका माजीमंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी सुशीलकुमार शिंदे यांच्यावर केली.

ठळक मुद्दे१२२ टीएमसी क्षमतेचे उजनी धरण पाण्याला शिस्त नसल्यामुळे पाणी उशाला असूनही शेतकºयांना मनस्ताप होतो - लक्ष्मण ढोबळेशेतीला खड्ड्यात घालणाºया नेत्याला जाब कोण विचारणार? या सर्वच दंडेलशाहीचा परिणाम म्हणून जिल्ह्यात शिंदेशाहीला पराभूत करणे हा भाजपचा संकल्प आहे - लक्ष्मण ढोबळे

सोलापूर : १२२ टीएमसी क्षमतेचे उजनी धरण पाण्याला शिस्त नसल्यामुळे पाणी उशाला असूनही शेतकºयांना मनस्ताप होतो. उजनीचे पाणी पुण्यातील प्रकल्पांना नको होते. इंदापूरमधील अनेक प्रकल्पांनी क्षमतेपेक्षा जास्त पाणी घेतले. एनटीपीसी प्रकल्पाला शेतकºयांचे दोन टीएमसी पाणी देऊन अवघा शेतकरी देशोधडीला लावला,  अशी टीका माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी एका पत्रकातून केली आहे.संजय मामांसारखा नेता केवळ स्वार्थासाठी मुख्यमंत्र्यांच्या कानाला लागला.

केवळ नातेवाईकांनाच कामे मिळावीत म्हणून हलक्या राजकारणाची रीत वापरली. कोलांटउड्या मारून सर्वात जास्त सत्ता भोगणारा नेता म्हणून संजयमामांना दोष द्यावा लागेल. जिल्ह्यात सर्वच साखरसम्राटांनी टनाला सरासरी दोन हजारांचा भाव दिला. लोकनेते साखर कारखाना खासगी करून तेवढ्यावर समाधान झाले नाही. दोनशे रुपये कमी करून टनाला १८०० रुपये भाव दिला. शेतीला खड्ड्यात घालणाºया नेत्याला जाब कोण विचारणार? या सर्वच दंडेलशाहीचा परिणाम म्हणून जिल्ह्यात शिंदेशाहीला पराभूत करणे हा भाजपचा संकल्प आहे. १० वर्षे संजय शिंदे यांनी स्वार्थासाठी समविचारी आघाडीचे नाटक वठविले.

सुडाचे राजकारण करताना जिल्ह्याचा नेता होण्यासाठी हलक्या कानाचे निरोप श्रेष्ठींना सांगण्यात धन्यता मानली तर आ. बबनदादांनी आपल्या क्षेत्रात अडथळा नको म्हणून संजयमामांना करमाळ्याकडे रेटले आणि मुलाचा राजकीय रस्ता डांबरी केला.

सोलापूरच्या सुकुमार सुपुत्रांनी कधी अंगणवाडीही काढली नाही. कार्यकर्त्याला पिठाची गिरणी काढण्याला मदत केली नाही. तरीही हसतमुखरावांनी सत्ता आणि संपत्तीच्या जोरावर जिल्हा २० वर्षे ताब्यात ठेवला. शिंदे हे अनिवासी सोलापूरकर असल्याने स्टेशनवरून घरी त्यांना स्वागत करून आणावे लागते.

नव्या उमेदवारास वारसा नोंदीची गरज नसल्याने उद्याच्या राजकारणात अक्कलकोट आणि दक्षिण यामध्ये कुणाला पराभूत करण्याचे कारस्थान उरत नाही. शिंदेशाहीने राजाश्रयाच्या नादात लोकाश्रय गमावला असून, वारसाला मोठे करण्याच्या नादात साथीदार दुखावले. कुठे खरटमल तर कुठे चाकोते यांना झळ लागली. एक साधारण पीएच्या कौतुकासाठी विष्णुपंतांसारखा माणूस दूर केला. वेळ आल्यावर कधी माने तर कधी साठे कुटुंबाला अपमानित केले. सतत म्हेत्रे कुटुंबाला पाण्यात पाहिले, असाही आरोप लक्ष्मण ढोबळे यांनी केला.

टॅग्स :Solapurसोलापूरsolapur-pcसोलापूरmadha-pcमाढाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकSushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेBabanrao Shindeबबनराव शिंदे