कडक इस्त्रीचे कपडे घालून संजय राऊत काहीही बोलतात : चंद्रकांत पाटील

By बाळकृष्ण दोड्डी | Updated: July 6, 2024 16:42 IST2024-07-06T16:41:49+5:302024-07-06T16:42:18+5:30

खासदार रवींद्र वायकर यांना क्लीनचीट मिळाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली.

Sanjay Raut says anything in tight ironed clothes: Chandrakant Patil | कडक इस्त्रीचे कपडे घालून संजय राऊत काहीही बोलतात : चंद्रकांत पाटील

कडक इस्त्रीचे कपडे घालून संजय राऊत काहीही बोलतात : चंद्रकांत पाटील

सोलापूर :संजय राऊत यांच्याकडे सध्या भरपूर वेळ आहे. कडक इस्त्रीचे कपडे घालून काहीही बोलणे हा आता त्यांचा आवडीचा छंद बनलेला आहे. सरकारवर टीका केल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही, असे प्रत्युत्तर राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी दिले.

कथित जोगेश्वरी भूखंड प्रकरणातून खासदार रवींद्र वायकर यांना क्लीनचीट मिळाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली. या टीकेला सोलापुरात उत्तर देताना पालकमंत्री पाटील यांनी राऊत यांना रोज एक वेळा वादग्रस्त बोलल्याशिवाय करमत नसल्याचे सांगितले.
पालकमंत्री पाटील हे शनिवारी सोलापूर दौऱ्यावर होते. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

Web Title: Sanjay Raut says anything in tight ironed clothes: Chandrakant Patil