वाळू ठेकेदाराच्या वाढदिनी हौशानवश्याची गर्दी; पोलिसांच्या समक्षच केकसाठी तलवार तळपली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 02:51 PM2020-04-27T14:51:42+5:302020-04-27T14:53:03+5:30

फिसरे येथील ‘हॅपी बड्डे भोवला’: कॉन्स्टेबलसह २४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

The sand contractor's birthday crowd cheers; The sword flashed for the cake in front of the police | वाळू ठेकेदाराच्या वाढदिनी हौशानवश्याची गर्दी; पोलिसांच्या समक्षच केकसाठी तलवार तळपली 

वाळू ठेकेदाराच्या वाढदिनी हौशानवश्याची गर्दी; पोलिसांच्या समक्षच केकसाठी तलवार तळपली 

Next
ठळक मुद्देआपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ व फौजदारी प्रक्रिया दंड संहिता कलम १४४ अन्वये जमावबंदी व संचारबंदीचे उल्लंघनकोराना व्हायरसमुळे ड्यूटीवर असलेले पोलीस कॉन्स्टेबल विनायक रामजी काळे या कार्यक्रमात सहभागी झाले

करमाळा : एकीकडे  कोरोना व्हायवसचे संकट ओढावलेले आहे. सारेच दहशतीखाली वावरत असताना करमाळा तालुक्यातील फिसरे येथे वाळू ठेकेदाराने वाढदिवस धुमधडाक्यात वाढदिवस साजरा केला तोही ड्यूटीवर  असलेल्या पोलीस कॉन्स्टेबसमवेत. या कार्यक्रमात केक कापण्यासाठी तलवारही तळपली. या प्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात त्या पोलिसासह २४ जणांविरुद्ध रविवारी गुन्हा नोंदला आहे.

ही घटना २४ एप्रिलच्या रात्री पावणे अकराच्या सुमारास हिवरे-फिसरे रोडवर घडली. यातील अतिउत्साही कार्यकर्त्यांनी हा फोटो व्हॉटसअप ग्रूपवर फिरवल्याची पोलिसांच्या निदर्शनास आला आणि करमाळा पोलिस ठाण्याचे बीट अंमलदार केदारनाथ •भरमशेटटी यांनी पोलिसात स्वत: फिर्याद दिली.

या फिर्यादीत त्यांनी म्हटले आहे की २४ एप्रिल रोजी हिसरे (ता.करमाळा ) येथील विकास विठ्ठल ननवरे यांचा वाढदिवस हिवरे ते हिसरे रोडवर रात्री १०.४५ वाजेच्या सुमारास धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. कोरोना विषाणूचा फैलाव, जमावबंदी व संचारबंदीचा अंमल सुरु असताना बेकायदा जमाव जमवून हातात तलवार घेऊन वाढदिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे फोटो हॉटसअप ग्रपवर पाठवल्यामुळे हा फोटो  बीट मधील पोलिस नाईक हराळे यांच्या निदर्शनास आला.

या कार्यक्रमास बाळासाहेब चंद्रकांत पवार, बाळासाहेब अंकुश कोंडलकर, दत्ता आबा टकले, हरी गोपीनाथ काळे, सतीश शिवदास ननवरे, अनिल संदिपान साळुंखे, अंबादास राऊत, हनुमंत पवार,गोरख काळे, योगिराज काळे, बबल्या पवार,नागेश पवार,संतोष काळे, सचिन काळे, नाना काळे, सोमनाथ काळे,किशोर काळे, अंगद काळे, धनाजी काळे,बिाभीषण काळे, रघुनाथ  पवार, अतुल रनदील (सर्व रा.हिसरे) यांची उपस्थिती होती. याशिवाय कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर  जमावबंदी व संचारबदीमुळे नेमणुकीस असलेले सोलापूर ग्रामीणचे पोलिस विनायक रामजी काळे उपस्थित होते, असे फिर्यादीत म्हटले आहे.

आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ व फौजदारी प्रक्रिया दंड संहिता कलम १४४ अन्वये जमावबंदी व संचारबंदीचे उल्लंघन करून वाढदिवस साजरा केल्याप्रकरणी सर्वांच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे.

सार्वजकि कार्यक्रम घेणे पडले महागात
- कोराना व्हायरसमुळे ड्यूटीवर असलेले पोलीस कॉन्स्टेबल विनायक रामजी काळे या कार्यक्रमात सहभागी झाले. अन् करमाळा पोलिस ठाण्याचे बीट अंमलदार केदारनाथ •भरमशेटटी यांना  एका व्हॉटस्अप ग्रूपवर ही बाब निदर्शनास आल्याने हा प्रकार उघडकीस आला. जमावबंदी अन् संचारबंदीचा काळ असताना, कोरोनाचं संकट असताना सार्वजनिक कार्यक्रम घेणे सर्वांनाच भोवल्याची चर्चा करमाळा तालुक्यात चर्चिली जात आहे.

Web Title: The sand contractor's birthday crowd cheers; The sword flashed for the cake in front of the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.