साेलापुरच्या कैद्याचा पुण्यातील येरवडा कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2022 16:33 IST2022-02-09T16:33:16+5:302022-02-09T16:33:22+5:30
आत्महत्याचे कारण अद्याप पर्यंत समजू शकले नसल्याचे सांगण्यात आले ...!

साेलापुरच्या कैद्याचा पुण्यातील येरवडा कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या
सोलापूर : पुण्यातील येरवडा कारागृहातील पोकसो गुन्ह्यातील न्यायाधीन बंद्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्येच कारण अद्याप पर्यंत समजू शकले नाही. समाधान कांतीलाल सावंत वय २६ सोलापूर असे मयताच नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपी समाधान कांतीलाल सावंत या आरोपीवर इंदापूर येथील पोकसो गुन्ह्या संदर्भात २४ जानेवारी रोजी तात्पुरत्या कारागृहात रवानगी करण्यात आली होती. आरोपी समाधान सावंत ज्या खोलीत राहत होता. त्या खोलीत अन्य तिघे आरोपी देखील होते.पण आरोपी समाधान याने सोमवारी पहाटेच्या सुमारास टॉवेल च्या मदतीने गळफास घेतला. हे इतरांच्या लक्षात येताच, कारागृहातील डॉक्टरांनी तपासणी केली असता.समाधान सावंत याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. तर आत्महत्या का केली हे कारण अद्याप पर्यंत समजू शकले नसल्याचे सांगण्यात आले आहे.