भाजीपाला वाहतूक करणाऱ्या टेम्पोत आढळली गुटख्याची पोती; ६३ लाख ५० हजाराचा मुद्देमाल जप्त

By Appasaheb.patil | Updated: April 19, 2023 13:35 IST2023-04-19T13:34:44+5:302023-04-19T13:35:37+5:30

चौघांविरोधात गुन्हा दाखल

Sack of Gutkha found in tempo transporting vegetables; 63 lakhs 50 thousand seized in solapur | भाजीपाला वाहतूक करणाऱ्या टेम्पोत आढळली गुटख्याची पोती; ६३ लाख ५० हजाराचा मुद्देमाल जप्त

भाजीपाला वाहतूक करणाऱ्या टेम्पोत आढळली गुटख्याची पोती; ६३ लाख ५० हजाराचा मुद्देमाल जप्त

सोलापूर : भाजीपाला वाहतूक करणाऱ्या टेम्पोतून अवैधपणे गुटख्याची होणारी वाहतूक मंद्रुप पोलिसांनी रोखली. हा गुटखा सिंधुदुर्गमार्गे कर्नाटक राज्यात जात होता.  या कारवाईत ६३ लाख ५० हजार ८१६ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

महादेव संभाजी परब (वय ४२, रा. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग), प्रथमेश गमा कानेकर (वय २३), गाडी मालक सादीक शेख (वय ३५), साठ्याचे मालक निजामभाई (वय ३५) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.   याबाबत पोलिसांनी सांगितलेली माहिती अशी की, १८ एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास बसवनगर ते टाकळी, मंद्रुपच्या हद्दीतून केए २२ एए ०४९२ या भाजीपाला वाहतूक करणार्या टेम्पोतून २ लाख ६४ हजाराचा गुटखा व ७ लाख रूपये किंमतीचा टेम्पो मंद्रुप पोलिसांनी पकडला. याप्रकरणात अद्याप एकालाही अटक करण्यात आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.  या घटनेची नोंद मंद्रुप पोलिस ठाण्यात झाली असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक रविंद्र मांजरे हे करीत आहेत.

Web Title: Sack of Gutkha found in tempo transporting vegetables; 63 lakhs 50 thousand seized in solapur