बार्शी शहरात कोरोना देवीची अफवा; दोघांविरूध्द गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2020 17:13 IST2020-09-02T17:13:55+5:302020-09-02T17:13:59+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकींग

Rumors of the goddess Corona in the city of Barshi; Filed a crime against both | बार्शी शहरात कोरोना देवीची अफवा; दोघांविरूध्द गुन्हा दाखल

बार्शी शहरात कोरोना देवीची अफवा; दोघांविरूध्द गुन्हा दाखल

सोलापूर : बार्शी येथे कोविड देवीची स्थापना करून जनतेमध्ये अफवा पसरवल्याप्रकरणी दोघांविरूद्ध बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे तहसीलदार डी.एस. कुंभार यांनी सांगितले.

देवीला नैवेद्य दिल्यास कोरोना होत नाही, मास्क घालण्याची आणि इतर काळजी घेण्याची आवश्यकता नाही. देवीची ओटी भरल्यास कोरोना बरा होतो, अशा अफवा सोमनाथ परशुराम पवार आणि ताराबाई भगवंत पवार (दोघेही रा. सोलापूर रोड, बार्शी) यांनी पसरवल्या. यामुळे त्यांच्यावर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियमान्वये कलम ५२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याचे कुंभार यांनी सांगितले.

Web Title: Rumors of the goddess Corona in the city of Barshi; Filed a crime against both