टेरिसवर उभे राहून महिलेची छेडछाड करणारा पंढरपुरातील रोमियो पोलिसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:55 IST2021-02-05T08:54:53+5:302021-02-05T08:55:18+5:30

निर्भया पथकाची कारवाई; छेड-छाडीचे केले चित्रिकरण

Romeo in Pandharpur arrested for molesting a woman while standing on a terrace | टेरिसवर उभे राहून महिलेची छेडछाड करणारा पंढरपुरातील रोमियो पोलिसांच्या ताब्यात

टेरिसवर उभे राहून महिलेची छेडछाड करणारा पंढरपुरातील रोमियो पोलिसांच्या ताब्यात

पंढरपूर : घराच्या टेरिसवर उभे राहून महिलाची छेड छाड करणाऱ्या रोमियोविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. अन् या प्रकरणी संजू रामचंद्र खडके (रा. गुरुदेवनगर, पंढरपूर) याला तत्काळ  पोलिसांनी  ताब्यात घेतले. ही कारवाई निर्भया पथकाने केली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, संजू खडके हा मागील सहा-सात महिन्यांपासून एका महिलेच्या घरासमोर येवून अश्लिल हावभाव करत होता. त्या महिलेकडे एकटक बघणे, कागदी गोळे फेकणे, तिच्या घरात डोकावून बघणे, ती कुठेही बाहेर गेले असता तिचा पाठलाग करणे, असे प्रकार वारंवार करून पीडित महिलेला संजू खडके त्रास देत होता.

याबाबतची माहिती पीडित महिलेच्या कुटुंबाने निर्भया पथक प्रमुख  राजेंद्र गाडेकर यांना सांगितली. त्यानंतर निर्भया पथकाने सापळा रचून संजू खडके याला त्या महिलेची छेड-छाड करताना रंगेहाथ पकडले. तसेच पोलिसांनी या घटनेचे मोबाईल मध्ये चित्रिकरण केले. यामुळे संजू रामचंद्र खडके याच्याविरुध्द पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात भा.द.वि कलम ३५४, ३५४(ड) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. अशी माहिती पो. नि. अरुण पवार यांनी दिली.

Web Title: Romeo in Pandharpur arrested for molesting a woman while standing on a terrace