वैराग येथे सराफ दुकानांवर दरोडा; सात लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 12:34 IST2020-12-24T12:33:10+5:302020-12-24T12:34:28+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकींग

Robbery at jewelery shops at Vairag - seven lakh silver lampas | वैराग येथे सराफ दुकानांवर दरोडा; सात लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास

वैराग येथे सराफ दुकानांवर दरोडा; सात लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास

सोलापूर - बार्शी तालुक्यातील वैराग येथील विनय चंद्रकांत गोवर्धन यांच्या सोने चांदीच्या दुकानावर बुधवार-गुरूवारच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दरोडा टाकला. यात पंधरा हजाराच्या रोख रकमेसह सुमारे सहा ते सात लाख रुपयांची चांदी लंपास केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

या दरोड्याची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक अरुण सुधाकर व उपनिरीक्षक राजेंद्र राठोड यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळाला भेट दिली. अधिक तपासा करीता श्वान पथक व ठसे तज्ञ दाखल झाले आहेत. यापुर्वी २००८ यांच्या व उदय गोवर्धन यांच्या दुकानावर दिवसा सहा वाजता दरोडा पडुन सुमारे पाच कोटीचे सोने व चांदीचे दागिने लुटले होते परत गतवर्षी देखील येथेच चोरी झाली होती.

Web Title: Robbery at jewelery shops at Vairag - seven lakh silver lampas